-
लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात. हे नवीन आयुष्य सुरू करण्यापूर्वी एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयी जाणून घेणे गरजेचे असते. (Photo : Freepik)
-
भारतीय समाज व्यवस्थेचा विचार केला तर लग्नानंतर मुलीचे आयुष्य बदलते. अशात लग्नाला होकार देण्यापूर्वी जोडीदाराबरोबर काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. (Photo : Freepik)
-
या काही गोष्टींवर चर्चा केल्यानंतर वैवाहिक जीवनातील अडचणी टाळता येऊ शकतात. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
कोणत्याही नात्यात दोन व्यक्तींच्या एकमेकांवर भरपूर अपेक्षा असतात. जर जोडीदाराने अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर व्यक्तीला दु:ख होऊ शकते. त्यामुळे लग्नाला होकार देण्यापूर्वीच मुलीने जोडीदाराला तिच्या जबाबदारीविषयी सांगितले पाहिजे, ज्यामुळे मुलीवर अपेक्षांचं ओझं राहणार नाही. (Photo : Freepik)
-
नोकरी आणि घर सांभाळताना जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा ठेवा, ज्यामुळे नोकरी करताना घर सांभाळणे सोपे जाईल. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही स्वच्छताप्रिय असाल तर वॉशरूम आणि बेडरूम स्वच्छ ठेवण्याविषयी जोडीदाराबरोबर बोला. यामुळे भविष्यात लग्नानंतर एकच वॉशरूम किंवा बेडरूम शेअर करताना तुम्हाला अडचणी येणार नाही आणि जोडीदारसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे स्वच्छता ठेवेल. (Photo : Freepik)
-
लग्नानंतर घरातील जबाबदारी वाटून घ्या, ज्यामुळे एकावर कधीही ओव्हर लोड येणार नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा जोडीदारही नोकरी करत असेल तर दोघांचा जॉब टाइम आणि सुट्ट्या बघून घरकाम आणि घरातील लहानमोठ्या जबाबदारी वाटून घ्या. (Photo : Freepik)
-
लग्नानंतर अनेकदा मुली संसारात इतक्या रमतात की, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात नसतात, पण हे चुकीचे आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मित्र-मैत्रिणींच्या सहवासाची आवश्यकता भासते. त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने तुम्ही बोलू शकता. (Photo : Freepik)
-
वैवाहिक आयुष्यातील अडचणी त्यांच्याबरोबर शेअर करू शकता. त्यामुळे लग्नाला होकार देण्याआधी भविष्यात जुन्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहणार असल्याचे जोडीदाराला सांगा. (Photo : Freepik)

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट