-
प्रत्येक स्त्रीला आपले केस रेशमी अमी मुलायम असावेत असे वाटते. बदललेल्या जीवनशैलीमुळे ताण, पोषक तत्वांची कमतरता आणि अनेकदा चुकीच्या उत्पादनांचा वापर केल्याने केस कोरडे होऊ शकतात.
-
कोरडे केस चांगले होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो. मात्र त्यातील काही रसायनांमुळे केस खराब होऊ शकतात. यावेळी केस मऊ आणि चांगले करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
-
अॅपल सायडर व्हिनेगर: अॅपल सायडर व्हिनेगर हे केसांसाठी फायदेशीर ठरते. त्यात असणारे प्रोटीन केसांना उपयोगी ठरते. याचा वापर करण्यासाठी एका बादलीत २ मोठे चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करावे.
-
शाम्पू केल्यानंतर अॅपल सायडर व्हिनेगरच्या पाण्याने केस धुवा. हे केसांना पाच ते दहा मिनिटे ठेवावे. नंतर साध्या पाण्याने केस धुवावेत.
-
कोरफड आणि दही : कोरफड शरीरासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे . केस चांगले होण्यासाठी कोरफड आणि दह्याचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता. यामुळे केसांना पोषण मिळते.
-
हा हेअर मस्क तयार करण्यासाठी एक चमचा कोरफड जेल, एक चमचा दही आणि एक चमचा मध याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांवर लावावे व ५ मिनिटे मसाज करून दहा मिनिटे केसांना लावून ठेवावे. थोड्या वेळाने केस साध्या पाण्याने धुवावेत.
-
मेथीचे दाणे: एक चमचा मेथीचे दाणे आणि थंडी खोबरेल तेल घ्या. मेथीचे दाणे आणि खोबरेल एक भाड्यांत २ आठवडे झाकून ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावावे व हलक्या हाताने मसाज करावा.
-
कडुलिंब आणि खोबरेल तेल: सर्वात पहिल्यांदा एक कप कडुलिंबाची पेस्ट तयार करावी. एका भांड्यात खोबरेल तेल आणि कडुलिंबाची पेस्ट मिक्स करावी. त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून सुमारे ५ ते १० मिनिटे उकळावे. मिश्रण गार झाल्यावर गाळून घ्यावे.
-
या प्रकारे कडुलिंबाचे तेल तयार होइल. हे तेल केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावा. हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.

भारतासह जगभरात हाहाकार घडवून आणू शकते ‘ही’ भविष्यवाणी; नॉस्ट्रॅडॅमसने २०२४ साठी काय लिहून ठेवलंय?