-
आपल्यापैकी अनेकांना पालक भाजी खूप आवडते. पालकमध्ये लाल आणि हिरवा, असे दोन प्रकार दिसतात. अनेक जण सहसा हिरवा पालक खरेदी करतात. (Photo : Freepik)
-
तुम्हीसुद्धा हिरवा पालक खाता का? पण तुम्हाला माहीत आहे का? हिरवा आणि लाल पालक यामध्ये कोणता सर्वांत जास्त आरोग्यासाठी फायदेशीर आहे? आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या. (Photo : Freepik and Twitter)
-
सध्या धावपळीच्या जीवनात माणसाच्या लाइफस्टाईलमुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. अशात वजनवाढीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. (Photo : Freepik)
-
पण, तुम्हाला माहीत आहे का की, लाल पालक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. लाल पालकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अतिभूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. (Photo : Twitter)
-
लाल पालकमधील प्रोटीन्स रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवतात. या पालकमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांमुळे पचनशक्तीसुद्धा वाढते. (Photo : Twitter)
-
लाल पालकमध्ये लोहाची मात्रा अधिक असते. या पालकचे सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि शरीरात कधीही
रक्ताची कमतरता भासत नाही. (Photo : Freepik) -
काही अभ्यासांतून असेही समोर आले आहे की लाल पालकच्या सेवनामुळे किडनीचे आरोग्य सुदृढ राहते आणि किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. (Photo : Freepik)
-
लाल पालकमध्ये व्हिटामिन के असते. हा पालक हाडे मजबूत करण्यास मदत करतो. त्याशिवाय पालकमध्ये फाइटोस्ट्रोलची मात्रासुद्धा असते; ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. (Photo : Twitter)
-
लाल पालकमध्ये औषधी गुणधर्म अधिक आढळतात. आफ्रिकेत गॅस्ट्रोच्या समस्येसाठी लाल पालकचा उपयोग हर्बल उपचार म्हणून केला जातो. (Photo : Freepik and Twitter)

“माझा मुलगा जर रणबीर कपूर किंवा आलिया भट्टइतका…”, परेश रावल यांनी केलेले विधान चर्चेत