-
मुळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, आर्द्रता, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ हे सर्व औषधी घटक विपुल प्रमाणात असतात.
-
मुळा चवीला तिखट, किंचित गोड व जिभेला चरचरणारा असतो.
-
मुळा लाल व पांढरा अशा दोन प्रकारचा असतो.
-
सहसा मुळा हा जेवणाबरोबर इतर आहारीय पदार्थांबरोबर खावा.
-
मुळा अग्निप्रदीपक असल्यामुळे जेवताना चांगली भूक लागण्यासाठी व घेतलेला आहार पचण्यासाठी मुळा त्याच्या चकत्या करून त्या जेवणाबरोबर कच्च्या खाव्यात.
-
रिकाम्या पोटी मुळा खाल्ल्यास छातीत व पोटात जळजळ सुरू होते.
-
म्हणून पित्तप्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी मुळा जपूनच खावा.
-
तसेच शरद ऋतूमध्ये पित्तप्रकोप होत असल्याकारणाने मुळा खाणे अहितकारक असून, त्यामुळे तो खाणे टाळावे.
-
वर्षभर मुळा खाता यावा म्हणून मुळ्याचे रायते, लोणचे करून खावे.
-
तसेच ताज्या मुळ्याचा वर्षभर पराठा, चटणी, कोशिंबीर, थालीपीठ अशा अनेक प्रकारे मुळा आहारामध्ये घेता येतो.
-
सर्व फोटो सौजन्य : Pexels (हेही पाहा : ‘हे’ आहेत खारवलेले पिस्ता खाण्याचे दुष्परिणाम)
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

“राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”, अजित पवारांचा खळबळजनक आरोप!