-
वयानुसार आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असला तरीही आपल्या जीवनशैलीचाही डोळ्यांवर परिणाम होतो
-
आपली दृष्टी सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत
-
लाल मिरची
लाल मिरचीमध्ये प्रति कॅलरी सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी तुमच्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांसाठी उत्तम आहे आणि यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होऊ शकतो. लाल मिरचीमधून व्हिटॅमिन सी मिळते, तसेच स्ट्रॉबेरी, फ्लॉवर यांसारख्या विविध पदार्थांमधूनही ते मिळते -
हिरव्या पालेभाज्या:
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्याही शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी चांगल्या असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. -
हिरव्या पालेभाज्या:
५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये दृष्टिदोष निर्माण होतात. त्यांनी हिरव्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात. यामुळे व्हिटॅमिन सी मिळते -
मासे:
माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असते. याचे तुमच्या शरीराला खूप फायदे असतात. ओमेगा ३ हे ट्यूना, सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन आणि अँकोव्ही माशांमध्ये अधिक असते. -
नट्स :
नट्समध्ये ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन ईदेखील असते. -
गाजर
गाजर, रताळे, संत्री यांमध्ये बीटा-कॅरोटीन जास्त असते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते. -
बीन्स
जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे बीन्स. यामध्ये कमी फॅट्स, फायबर, झिंक आणि विविध जीवनसत्त्वे असतात. -
पाणी
डोळ्यांच्या आरोग्यासाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे दिवसभर आरामदायी वाटते. -
ब्रोकोली
ही भाजी प्रत्येकालाच आवडते असं नाही. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. -
अंडी
अंड्यांमध्ये झिंक देखील जास्त असते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते

छगन भुजबळांचं शरद पवारांवर शरसंधान; म्हणाले, “एवढी चिडचिड…!”