-

केळीचे फळ केवळ स्वादिष्टच नाही तर केळीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. केळी अनेक पोषक तत्वांनी युक्त फळ आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, कार्ब्स, मॅग्नेशियम, तांबे, सोडियम, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-६, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात.
-
रोज एक केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारतेच शिवाय अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. जाणून घेऊया रोज केळी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.
-
केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करते, त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर रोज एक केळी खाल्ल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्याची शक्यता वाढते.
-
केळीमध्ये असलेले पोटॅशियम किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरात किडनी स्टोनची शक्यता कमी होते आणि किडनीचे कार्य क्षमता वाढते.
-
केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे शरीराला संसर्ग आणि रोगांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहेत. रोज एक केळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि अनेक आजारांपासून संरक्षण देखील होते.
-
केळीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.केळी ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांशी संबंधित समस्यांचा धोका कमी करतात.
-
हृदयाच्या आरोग्यासाठीही केळी फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
-
केळी हे उष्मांक असले तरी हे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. त्यात असलेली नैसर्गिक साखर आणि कर्बोदके शरीराला झटपट ऊर्जा देतात, सतत केळी खाल्ल्याने शरीरातील थकवा कमी होतो.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: फ्रीपीक)
HEALTHY LIVING: दररोज फक्त एक केळ खाल्ल्यास ‘या’ धोकादायक आजरांपासून मिळू शकतो आराम; वाचा तज्ञांचा सल्ला
रोज एक केळी खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. जाणून घेऊया रोज केळी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.
Web Title: Healthy living eating just one banana a day can get relief from these dangerous diseases read expert advice arg 02