-
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे अनेकांना त्रास होतो. केस गळण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे चुकीचा आहार. जर तुम्हाला केस गळण्याची काळजी वाटत असेल तर आहारतून काही खाद्य पदार्थ टाळले पाहिजे जे केसांसाठी हानिकारक असतात आणि केस गळण्याची समस्या वाढवतात.
-
जर तुम्हाला केस गळण्याची काळजी वाटत असेल तर आहारतून काही खाद्य पदार्थ टाळले पाहिजे जे केसांसाठी हानिकारक असतात आणि केस गळण्याची समस्या वाढवतात.
-
तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात जळजळ वाढू शकते, ज्यामुळे केस गळू शकतात.
-
या तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि अस्वास्थ्यकर तेल असतात, ज्यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते आणि केसांच्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक असू शकतात.
-
चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पेयांचे अतिसेवन केल्याने शरीरातील निर्जलीकरण वाढते, ज्यामुळे केस गळतात.
-
जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करता तेव्हा ते तुमच्या शरीराला निर्जलीकरण होते, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळतात. कॅफिनमुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषणही प्रभावित होते.
-
मैदाच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांमुळे इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे केस गळण्याची शक्यता वाढते.
-
हार्मोनल असंतुलनमुळे देखील केस गळतात किंवा शरीरात पोषणाच्या कमतरतेमुळेही केस गळू शकतात.
-
लोणचे, खारट स्नॅक्स आणि जास्त मीठयुक्त पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. अतिरिक्त सोडियममुळे शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो, त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण केसांच्या मुळांपर्यंत पोहोचत नाही आणि मुळे कमकुवत झाल्याने केस गळू लागतात. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक