-
गरोदरपणात महिलेला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. महिलांनी या दरम्यान सक्रिय राहणे, तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
व्यायामापासून आहारापर्यंत निरोगी जीवनशैली अंगीकारणे, महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीये का, गरोदरपणात चालणे खूप फायदेशीर आहे. (Photo : Freepik)
-
योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
गरोदरपणात चालण्यामुळे मांड्या व पेल्विक फ्लोअरची लवचिकता वाढते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. घोट्या आणि पायांमधील सूज कमी होते. (Photo : Freepik)
-
गरोदरपणात चालण्यामुळे मांड्या व पेल्विक फ्लोअरची लवचिकता वाढते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. घोट्या आणि पायांमधील सूज कमी होते. (Photo : Freepik)
-
गरोदरपणात चालण्यामुळे गर्भधारणेदरम्यान वाढणारे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कार्य सुधारण्यास मदत होते आणि तणाव कमी होऊन मूड फ्रेश होतो. (Photo : Freepik) -
गर्भधारणेदरम्यान चालणे सुरक्षित आणि गरजेचे मानले जात असले तरी काही काळजी घेणे महत्वाचे आहे. (Photo : Freepik)
-
१. गर्भधारणेदरम्यान कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
२. चालण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर पुरेसे हायड्रेटेड आहात याची खात्री करा. पाण्याची बाटली सोबत ठेवा. (Photo : Freepik) -
३. चालताना शरीराचे पोश्चर व्यवस्थित असू द्या.
४. सुरुवातीला कमी अंतर व हळूहळू चालण्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा कालावधी आणि तीव्रता वाढवा.
५. चालताना दम लागणार नाही, श्वास फुलणार नाही याची काळजी घ्या.
६. आरामदायी चप्पल/ शूज निवडा.
७. स्वच्छ वातावरणात व शक्यतो सूर्योदय/ सूर्यास्ताच्या वेळेस फिरायला जा. (Photo : Freepik)

GBS Updates : पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या उद्रेकाचं कारण महिनाभरानंतर अखेर सापडलं!