-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो, तर अनेकदा मंगळाचा अशुभ प्रभावही अनेक राशींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, मंगळ ग्रह २१ जानेवारी (आज) रोजी कर्क राशीतून उलट्या चालीने मिथुन राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची वक्री चाल अनेक अडचणी निर्माण करणार असेल. या काळात प्रवासात अडचणी येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि नात्यात गैरसमज वाढू शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही मंगळाची वक्री चाल अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात नोकरीत बदलाचे संकेत आहेत. नशीब तुमच्या बाजूने कमी असल्याने व्यवसायातही नुकसान होऊ शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळाची वक्री चाल मीन राशीसाठी अत्यंत चिंताजनक ठरेल. वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातील भागीदारी तुटू शकते आणि खर्च वाढू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या