-
चेहऱ्यावरील धूळ साफ करण्यासाठी अनेक लोक फेसवॉशचा वापर करतात. यामुळे चेहऱ्यावर चिकटलेली घाण निघून जाते. परंतु, ही घाण साफ होण्यासाठी फेसवॉश कितपत योग्य आहे?
-
फेसवॉश वापरण्यात काही गैर नाही. परंतु, फेसवॉश वापरण्यापूर्वी तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे मात्र नक्की जाणून घ्या.
-
प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या गरजा लक्षात घेऊन फेस वॉश तयार केला जातो.
-
गरज असेल तेव्हा फेस वॉशचा वापर करावा. म्हणजेच दिवसभर धावपळ करून घरी आल्यावर चेहऱ्यावर साचलेली घाण साफ करण्यासाठी तुम्ही फेसवॉशचा वापर करू शकता.
-
रात्री फेसवॉशने चेहरा धुवावा, कारण साचलेल्या घाणीमुळे त्वचा कोरडी होते आणि अकाली बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू शकतात.
-
कोरड्या त्वचेसाठी नेहमी मॉइश्चरायझरने फेस वॉश निवडावा.
-
त्याचप्रमाणे तेलकट त्वचेसाठी फोम आधारित फेस वॉश वापरण्याची शिफारस केली जाते.
-
बरीच लोकं फेसवॉशचा वापर न करता साबणाने चेहरा धुवून घेतात. असे करणे चुकीचे ठरेल आणि याचे कारण म्हणजे फेसवॉश हा त्वचेप्रमाणे बनविला जातो, परंतु साबण नाही.
-
याशिवाय जर तुम्ही तुमचा चेहरा नियमित साबणाने स्वच्छ केला तर ते त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून टाकते आणि ते कडक होऊ लागते.
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)