-
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. जेव्हा आपण कोणतेही अन्न खातो तेव्हा त्याचा शरीरावर होणारा परिणाम आपण ते कधी खातो यावरही अवलंबून असतो. त्यामुळे कोणते पदार्थ कोणत्या वेळी खाणे फायदेशीर आहे आणि कोणत्या वेळी ते टाळावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. आज आपण काही लोकप्रिय पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत आणि ते कधी खाणे सर्वात फायदेशीर आहे.
-
सफरचंद
सर्वोत्तम वेळ: सकाळी
चुकीची वेळ: रात्री
सफरचंदांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. हे सकाळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते. रात्री सफरचंद खाणे योग्य नाही कारण ते पचनासाठी जड असते त्यामुळे पचनक्रिया मंदावते. -
तांदूळ
सर्वोत्तम वेळ: सकाळी
चुकीची वेळ: रात्री
तांदूळ हा कार्बोहायड्रेटचा प्रमुख स्त्रोत आहे, जो सकाळी शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यास मदत करतो. रात्री भात खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. अशा स्थितीत दिवसा भात खाण्याचा सल्ला दिला जातो. -
चहा
सर्वोत्तम वेळ: संध्याकाळ
चुकीची वेळ: रात्री
चहामध्ये कॅफिन असते, जे संध्याकाळी मानसिक ताजेपणा आणि उर्जेसाठी उपयुक्त आहे. रात्री चहा प्यायल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे रात्री चहा पिणे टाळावे. -
दही
सर्वोत्तम वेळ: सकाळी
चुकीची वेळ: संध्याकाळ
दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असते, जे पचनासाठी चांगले असते. सकाळी दही खाणे फायदेशीर आहे कारण यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. संध्याकाळी दही खाल्ल्याने अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे संध्याकाळी दही खाणे टाळावे. -
मासे
सर्वोत्तम वेळ: रात्री
चुकीची वेळ: सकाळ
माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि प्रथिने असतात, जे रात्रीच्या वेळी शरीराचे अंतर्गत कार्य सुधारतात. सकाळी मासे खाणे फायदेशीर ठरु शकते, कारण ते पचायला वेळ लागतो. -
बदाम
सर्वोत्तम वेळ: सकाळी
चुकीची वेळ: रात्री
बदामामध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात, जे सकाळी शरीराला ऊर्जा आणि पोषण देतात. रात्री बदाम खाल्ल्याने जडपणा जाणवू यामुळे पचन क्रियेत अडथळा निर्माण होतो. म्हणून रात्रीच्या वेळी ते टाळावे. -
पोळी
सर्वोत्तम वेळ: २४ तास
चुकीची वेळ: कोणतीही नाही
पोळी हा संतुलित आहाराचा भाग आहे, जो दिवसभरात कधीही खाऊ शकतो. त्यात फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. पोळी खाण्याची काही विशिष्ट वेळ नाही, ती कधीही खाऊ शकतो. (फोटो क्रेटिड – Pexels )

“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”