-
कोल्हापूर म्हंटल की, डोळ्यासमोर येत प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ आणि येथील अनेक पर्यटन स्थळे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्राचे एक महत्वाचे ठिकाण आहे. तांबडा-पांढरा रस्सा बरोबरच येथील अनेक पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे झणझणीत, चटपटीत ‘भडंग’ (Kolhapuri Bhadang). (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
गरमागरम चहाबरोबर, संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी, तर ऑफिसमध्ये भूक लागल्यावर काहीतरी पोटभर खाण्यासाठी मसालेदार, झणझणीत सगळ्यांना खावंसं वाटतं असतं. तर संध्याकाळची छोटी भूक भागवायची असेल तर तुम्ही कोल्हापूरी स्टाईल भडंग अगदी १० मिनिटांत घरच्याघरी बनवू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
भडंग बनवण्यासाठी कुरमुरे, पाव किलो शेंगदाणे, कडीपत्ता, लसूण, तिखट मसाला, हळद, मिठ,तेल इत्यादी साहित्य लागेल.
तर १. दुकानातून १० ते १५ रूपयांचे कुरमुरे विकत आणा. फोटो सौजन्य: @freepik) -
२. एका कढईत तेल घ्या, त्यात पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या आणि नंतर त्यात कडीपत्ता (१० ते १५ पाने) टाका.(फोटो सौजन्य: @freepik)
-
३. लसूण, तिखट मसाला, हळद, मिठ मिक्सरमध्ये जाडसर बारिक करून घ्या. (टीप – लसूण सालीसह टाका).(फोटो सौजन्य: @freepik)
-
४. नंतर हे मिश्रण तेलात टाका.परतवून घ्या आणि मग त्यात कुरमुरे घाला.(फोटो सौजन्य: @freepik)
-
५. अशाप्रकारे तुमचा ‘कोल्हापूरी स्पेशल भडंग’ तयार.(फोटो सौजन्य: युट्युब / @PriyasKitchen_ )
-
१५ ते ३० दिवस भडंग अगदी व्यवस्थित राहील. त्यामुळे तुम्ही हा भडंग प्रवासात सुद्धा खायला घेऊन जाऊ शकता किंवा ऑफिसला जाणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. म्हणजे त्यांना संध्याकाळी भूक लागल्यावर दुकानातले चिप्स घ्यायची गरज भासणार नाही. (फोटो सौजन्य: युट्युब / @PriyasKitchen_ )

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल