-
हिवाळ्याच्या दिवसांत मेथीची भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे ज्यांना मेथीची भाजी खायला आवडते अशांच्या घरात आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी ही भाजी बनवली जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मेथीची सुकी भाजी, मेथी पराठा, मेथी पुरी असे विविध पदार्थ मेथीपासून बनवले जातात. पण, मेथीची भाजी बनवायला जितका वेळ लागत नाही, त्याहून अधिक वेळ मेथीची भाजी साफ करायला लागतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यामुळे अनेक जण ही भाजी घरी आणायचाच कंटाळा करतात. तुम्हालाही मेथीची भाजी साफ करण्याचा कंटाळा येत असेल, तर टेन्शन सोडा आणि मेथीची भाजी साफ करण्याची ही सोपी ट्रिक फॉलो करा (फोटो सौजन्य: Freepik)
-
सर्वप्रथम मेथीची जुडी हातात धरून, धारदार चाकूच्या साह्याने मागील बाजूचे जाड देठ कापून घ्या. हे करताना जाड देठाबरोबर काही मेथीची पानेही बाहेर येण्याची शक्यता असते. तुम्ही ती नीट व्यवस्थित लावून घेऊ शकता आणि नंतरसाठी बाजूला ठेवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यानंतर मेथीची जुडी उघडा आणि त्याच्या अनेक लहान लहान जुड्या बनवा. आता पुढील काही पाने हाताने काढून टाका आणि पुन्हा एकदा जाड देठ कापून घ्या. त्यानंतर चाकूच्या मदतीने राहिलेले देठ बारीक चिरून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik) -
मेथीच्या भाजीच्या सर्व पानांच्या लहान जुड्या बारीक चिरून घेतल्यावर आता जाड देठाला चिकटलेली पाने काढून टाका. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. हे करताना काळी किंवा पिवळी पाने दिसल्यास ती घेऊ नका. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता या पायरीमध्ये बारीक चिरलेल्या मेथीच्या पानांपासून माती काढण्यासाठी दोन ते तीन वेळा ती स्वच्छ पाण्याने धुवा. यावेळी त्यात मीठ घालायला विसरू नका. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भाजी धुताना त्यात मीठ घातल्यास, त्यात सूक्ष्म अळ्या, जंतू असल्यास ते निघून जातात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)

S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”