-
बऱ्याचदा काही घरांमधील लोक सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघताना ब्रेड खाणं पसंत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
शाळेत जाणाऱ्या मुलांनाही त्यांची आई ब्रेड-जाम, ब्रेड सँडविच खायला देते. काही जण ब्रेडला बटर किंवा जाम लावून खातात; तर काही जण ब्रेड टोस्ट करून खातात. (फोटो सौजन्य: Freepik) -
आपण ब्रेड कसे खाऊ शकतो; जेणेकरून ते लवकर पचतील आणि शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ब्रेड खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो टोस्ट करणे. कारण- त्यामुळे रक्तातील साखर किंवा ग्लुकोजच्या वाढीस २५ टक्क्यांहून अधिक घट होते. जेव्हा आपण ब्रेड टोस्ट करतो तेव्हा एक रासायनिक अभिक्रिया होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याद्वारे कार्बोहायड्रेट्सचे विघटन झाल्याने ब्रेड पचवणे खूप सोपे होते आणि त्यामुळे शरीराला कमी कॅलरीज मिळतात. तसेच, ग्लुकोज रक्तात खूप हळूहळू पोहोचते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
टोस्टेड ब्रेड किंवा सामान्य ब्रेड खाणे हे पूर्णपणे व्यक्तीच्या आरोग्य स्थिती आणि पसंतीवर अवलंबून असते. टोस्ट केलेल्या ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) थोडा कमी असतो. हे अन्न रक्तातील साखरेवर किती लवकर परिणाम करते. टोस्टेड ब्रेड साध्या ब्रेडपेक्षा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायचे असेल, तर ब्रेड खाण्यापूर्वी ते फ्रिजरमध्ये ठेवा. दुसन्या दिवशी ते टोस्ट करा आणि खा. असे केल्याने रक्तातील साखर ४०% कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कारण- जेव्हा ब्रेड गोठवले जातात आणि नंतर टोस्ट केले जातात तेव्हा ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कारण- त्या ब्रेडमध्ये ‘प्रतिरोधक स्टार्च’ तयार होऊ लागतो. हे स्टार्च आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंसाठी फायदेशीर असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा