-
आहारतज्ज्ञ झोपण्यापूर्वी जड आहार घेऊ नका, असे सुचवतात.
-
त्याऐवजी हलकी फळे खाल्ल्यामुळे शरीराला खूपच फायदा होतो.
-
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल यांनी सांगितले की, जड आहारामुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे काही जुनाट आजार होतात.
-
झोपण्यापूर्वी जड अन्न खाल्ल्यास शरीराला कार्बोहायड्रेट पचण्यास कठीण जाते; परिणामी, वजन वाढू शकते आणि अॅसिडिटीचा त्रासही होऊ शकतो.
-
एखाद्याला ओटीपोटात दुखणे, अस्वस्थता, सतत छातीत जळजळ आणि आम्लतादेखील होऊ शकते.
-
जे रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणा, हृदयाच्या समस्या आणि मधुमेह होण्याची शक्यता असते.
-
जंक फूड जास्त प्रमाणात खाणे, विशेषत: रात्री उशिरा, कोलेस्टेरॉल आणि फॅटी डिपॉझिटमुळे (ज्याला प्लेक म्हणतात) रक्तवाहिन्या अरुंद आणि बंद होऊ शकतात, असे डॉ. पटेल म्हणाले.
-
या समस्येवर उपाय सांगताना शारदा हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ श्वेता जैस्वाल म्हणाल्या, झोपण्यापूर्वी हलकी फळे खाल्ल्याने झोपेची कोणतीही हानी न होता, रात्री उशिरापर्यंतची भूक कमी होण्यास मदत होते.
-
फळांमध्ये नैसर्गिकरीत्या कॅलरी कमी असतात आणि त्यात सौम्य साखर असते, जी साखरेचा क्रॅश न होता इच्छा पूर्ण करते.
-
हे एकंदर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
-
झोपण्यापूर्वी बेरी (जसे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी), चेरी, किवी, पीच आणि प्लम्स ही फळे खाल्ल्यास अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels) हेही पाहा : भिजवलेल्या काजूंचा आहारात करा समावेश; शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…