-
हल्ली बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हे अनेकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो, ज्यावर उपाय म्हणून लोक विविध प्रयोग करताना दिसतात; पण त्यांचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. (फोटो सौजन्य: Freepik) -
जर तुम्हालाही लठ्ठपणाचा त्रास होत असेल आणि सर्व प्रयत्न करूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर तुम्ही चिया सीड्स वापरू शकता. (फोटो सौजन्य: Freepik) -
खरं तर, चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात, जे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यात प्रथिने आणि अँटी ऑक्सिडंट्सदेखील असतात, जे चयापचय प्रक्रियेला गती देतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून खाऊ शकता. त्यासाठी चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही ते पिण्यापूर्वी एक तास भिजवू शकता. तुम्ही त्यात लिंबाचा रस मिसळूनही पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही सॅलडबरोबर चिया सीड्सदेखील खाऊ शकता. हे खाण्यासाठी प्रथम सॅलड कापून घ्या आणि नंतर त्यावर चिया सीड्स शिंपडा. आता तुम्ही ते सॅलडबरोबर खाऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही चिया सीड्सची पावडर बनवून, ती दुधाबरोबरही घेऊ शकता. त्यासाठी प्रथम चिया सीड्स उन्हात वाळवा. आता ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक पावडर बनवा. तुम्ही रात्री दुधात घालूनही ते पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोन्ही ठाकरे एकत्र आले तर…”