-
उपवास केल्यानंतर लगेचच पोटभर जेवल्याने शरीरारवर गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण शरीराला अचानक येणाऱ्या अन्नाशी जुळवून घेण्यास त्रास होतो. मुंबईतील डॉ. शरीफा स्किनकेअर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांच्या मते, उपवासानंतर जेवताना त्यात जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मिष्टान्न यांचा समावेश असतो, ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात जसे की, ब्रेकआउट्स, जळजळ.
-
शिवाय, जास्त मीठ सेवन केल्याने चेहऱ्यावर सूज येऊ शकते, ज्यामुळे जास्त पाणी साचून राहते, त्वचा सुजलेली आणि थकलेली दिसते. जास्त खाल्ल्याने डिहायड्रेशन देखील होऊ शकते, ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक आणि लवचिकता कमी होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. अशा समस्यांना सामोरे जाण्यासाठी डॉ. चाऊस यांनी काही टिप्स सांगितल्य आहेत.
-
ताजी फळे, भाज्या आणि चिकन, मासे यांचा समावेश करा. जंकफूट, प्रक्रिया केलेले, तेलकट आणि पॅकिंग केलेला अन्नपदार्थ खाणे टाळा.
-
कमीत कमी ७-८ तास गाढ झोप घेऊन रात्रभर तुमच्या त्वचेला बरे होऊ द्या.
-
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्या. दररोज २-३ लिटर पाणी किंवा हायड्रेटेड राहण्यासाठी निंबू पाणी, ताक किंवा नारळ पाणी यासारखे इतर द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करा.
-
पोटॅशियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटफुगी कमी होते.
-
तज्ञांच्या सल्ल्याचे पालन करा आणि सौम्य एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग मास्क वापरा. डॉक्टरांच्या माहितीशिवाय हार्ड स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरू नका. (सर्व फोटो- फ्रीपिक)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…