-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचागानुसार, सध्या मीन राशीत असलेला सूर्य तो १४ एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत त्यानंतर १५ मे रोजी शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या वृषभ राशीतील प्रवेशाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या वृषभ राशीतील प्रवेशाने कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
वृषभ राशीसाठी सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीसाठी सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…