-
भेंडी ही बहुतेक लोकांच्या आवडत्या भाज्यांपैकी एक आहे. ही भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के व अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
परंतु, कधी कधी घरात एकाच वेळी दोन भाज्या बनवल्या जातात किंवा या भाजीबरोबर तोंडी लावायला इतर काही पदार्थ नकळत खाल्ले जातात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? भेंडीच्या भाजीबरोबर इतर काही ठरावीक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
दूध किंवा कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ कधीही भेंडीबरोबर खाऊ नयेत. खरे तर, भेंडी आणि दूध या दोघांचे गुणधर्म परस्परविरोधी आहेत. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी मेळ बसत नाही, ज्यामुळे पचनाच्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
भेंडीबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत. टोमॅटो किंवा लिंबू, लोणचे यांसारख्या आंबट पदार्थांबरोबर भेंडी खाणे टाळावे. खरे तर भाजीमध्ये ते घालल्याने भेंडीच्या पौष्टिक मूल्यावर विपरीत परिणाम होतो.
(फोटो सौजन्य: Freepik) -
भेंडीसह कारले खाणे हानिकारक ठरू शकते. भेंडी शीतल गुणधर्मी आहे आणि कारले चवीला कडू असते. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ले, तर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
भेंडी खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. खरे तर भेंडीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि चहामध्ये टॅनिन चांगल्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने शरीरात लोह योग्य प्रमाणात शोषले जात नाही.
(फोटो सौजन्य: Freepik) -
भेंडीच्या भाजीबरोबर मांसाहार करू नये. या दोन्ही गोष्टी पचायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे दोन्हींचे एकत्रित सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?