-
वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे, अन्यथा मोठा दंड आकारला जाऊ शकतो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
वाहन चालवताना खाली दिलेले १० नियम लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. कारण, त्यात तुरुंगवासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
१. ओव्हरस्पीडिंग, स्टंट आणि धोकादायक ड्रायव्हिंगसाठी दंड
रेसिंग आणि ओव्हरस्पीडिंगसह स्टंट आणि धोकादायक ड्रायव्हिंग करताना पकडल्यास ५,००० रुपयांचा दंड आकारला जातो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
२. अल्पवयीन वाहन चालवताना आढळल्यास दंड, तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद
अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालवाना आढळल्यास पूर्वी २,५०० रुपये दंड आकारला जात होता. जो आता २५,००० रुपये करण्यात ला आहे. याशिवाय, यामध्ये ३ वर्षांचा तुरुंगवास, एक वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द आणि २५ वर्षांसाठी चालक परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
३. मद्यपान करून वाहन चालवणे
मद्यपान करून वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड आहे. यासोबतच ६ महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो. याच गुन्हयात पुन्हा पकडल्यास, १५,००० रुपये दंड आणि २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
४. सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे
सीट बेल्ट न लावता वाहन चालवल्यास १,००० रुपयांचे चालान जारी केले जाऊ शकते. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
५. मोबाईल फोनचा वापर
वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास ५,००० रुपये दंड आकारला जातो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
६. हेल्मेट
हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवल्यास एक हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
७. विमा आणि डीएल (चालक परवाना)
वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड आहे. तसेच वैध विमा कागदपत्रे नसल्यास २,००० रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवास होऊ शकतो. पुन्हा पकडल्यास चार हजार रुपये दंड आकारला जातो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
८. पीयूसी
प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास १०,००० रुपयांचा दंड आकारला जातो. तसेच ६ महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
९. रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याबद्दल
रुग्णवाहिका किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन वाहनाला रस्ता न दिल्यास १०,००० रुपये दंड आकारला जातो. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस) -
११०. सिग्नल ब्रेक
आता सिग्नल तोडल्याबद्दल ५ हजार रुपयांचे चालान जारी केले जाते. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”