-
मीठाशिवाय कोणताही पदार्थ बेचव वाटतो. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (Photo: Unsplash)
-
पण खूप कमी लोकांना माहिती आहे की, फक्त एक चिमूटभर मीठदेखील आर्थिक अडचणी दूर करू शकते. (Photo: Unsplash)
-
१ – आर्थिक संकटात मीठ अशा प्रकारे वापरा
जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर एका काचेच्या बाटलीत पाणी, मीठ आणि दोन लवंग यांचे मिश्रण करा. (Photo: Unsplash) -
घरात वाढेल लक्ष्मीचा वावर
ज्योतिषशास्त्रानुसार, असे केल्यास तुम्हाला काही दिवसांत आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. (Photo: Unsplash) -
२- चिमूटभर मीठ पैशाची कमतरता दूर करेल
ज्योतिषशास्त्रानुसार, एका ग्लासमध्ये पाणी आणि मीठ मिसळून ते घराच्या नैऋत्य दिशेला ठेवल्यानेही आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते. (Photo: Unsplash) -
इतक्या दिवसांनी पाणी बदला
हे पाणी दर १५ दिवसांनी बदलले पाहिजे. आर्थिक समस्यांबरोबरच, तुम्हाला इतर समस्यांपासूनही आराम मिळू शकेल. (Photo: Unsplash) -
३- गरिबीत मिठाचा वापर
ज्योतिषशास्त्रानुसार, पाण्यात मीठ घालून घर पुसल्यानेही गरिबी दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. (Photo: Unsplash) -
४- ताणतणावात मिठाची मदत
यासोबतच, पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावही कमी होतो, असेही मानले जाते. (Photo: Unsplash) -
५- संबंधातही होते सुधारणा
काचेच्या भांड्यात किंवा काचेच्या ग्लासमध्ये सैंधव मीठ टाकून बेडरूममध्ये ठेवल्याने खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पती-पत्नीमधील प्रेमही वाढते. (Photo: Pexels)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल