-
सध्या देशाच्या अनेक भागात वळवाचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे डासांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. (Photo – Freepik)
-
डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डासांचा धोका सर्वत्र दिसून येतो. (Photo – Freepik)
-
अनेक उपाययोजना करूनही डासांची पैदास कमी होत नाही, म्हणूनच आज आम्ही डासांना दूर ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. (Photo – Freepik)
-
निलगिरी तेलाचा स्प्रे डास दूर ठेवण्यासाठी मदत करू शकतो. असा स्प्रे बनवण्यासाठी १० मिली निलगिरी तेलात ९० मिली नारळ तेल मिसळा आणि ते वापरा. (Photo – Freepik)
-
डासांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचा धूर खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्ही सुक्या कडुलिंबाची पाने जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवू शकता. तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता, यामुळे खोलीतील वातावरण देखील सुधारते. (Photo – Freepik)
-
डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लसूण पाण्यात उकळा. हे पाणी तुमच्या खोलीत व्यवस्थित शिंपडा. (Photo – Freepik)
-
लवंग तेलाचा स्प्रे बनवून तोही डासांना दूर ठेवण्यासाठी वापरू शकता. लवंग तेलाचे १० थेंब ६० मिली पाण्यात मिसळा आणि बाटलीत भरून त्याचा स्प्रे करा. (Photo – Freepik)
-
डासांना दूर ठेवण्यासाठी आणि स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खालीलपैकी एक तेल वापरा: लैव्हेंडर, कडुलिंब, सिट्रोनेला, निलगिरी आणि पेपरमिंट. या तेलाचे काही थेंब एका स्प्रे बाटलीमध्ये पाण्यात मिसळा आणि ते तुमच्या घरात सर्वत्र फवारणी करा. (Photo – Freepik)
-
कडुलिंबाचे तेल, नारळाचे तेल आणि लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून घरात फवारणी करा. यामुळे डास दूर राहू शकतात. (Photo – Freepik)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्