-
चेहरा फुगीर होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जेव्हा ती नियमित होते तेव्हा ती जीवनशैलीतील असंतुलन किंवा अंतर्निहित आरोग्य समस्या दर्शवू शकते. त्वचारोगतज्ज्ञ किंवा सामान्य चिकित्सकाकडून सखोल तपासणी केल्यास मूळ कारण ओळखण्यास आणि लक्ष्यित उपचार देण्यास मदत होऊ शकते. (स्रोत: पेक्सेल्स)
-
गुडगाव येथील बॉडीक्राफ्ट क्लिनिक्सच्या वैद्यकीय संचालक आणि संस्थापक डॉ. मिक्की सिंग यांनी तुम्हाला चेहरा फुगीर का होतो याची ५ कारणे सांगितली आहेत:
१. रात्री झोपताना शरीरात द्रव साठतो. आपण अनेक तास आडवे झोपल्याने शरीरातला द्रव खाली न जाता चेहरा, विशेषतः डोळ्यांभोवती आणि गालांमध्ये साचतो. हे टाळण्यासाठी झोपताना उशी थोडी उंच ठेवावी. तसेच, झोपण्यापूर्वी जास्त खारट किंवा जड अन्न टाळावे, कारण त्यामुळे द्रव साठवण अधिक होते. (स्रोत: पेक्सेल्स) -
२. धूळ, पाळीव प्राण्यांचा कोंडा, काही स्किनक्रिम किंवा अॅलर्जीमुळे त्वचेवर सूज येऊ शकते. विशेषतः डोळ्यांच्या भोवतीची त्वचा नाजूक असल्याने तिथे जास्त सूज दिसते. हे टाळण्यासाठी अॅलर्जी न होणारी चादर व उशी वापरा, उशीचे कव्हर स्वच्छ ठेवा आणि रात्री फ्रेगरांस फ्री क्रिम वापरा. (स्रोत: पेक्सेल्स)
-
३. अल्कोहोल किंवा जास्त सोडियम असलेले जेवण: दारू किंवा खूप खारट जेवण घेतल्यास शरीरात पाणी कमी होते आणि पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे चेहऱ्यासारख्या मऊ भागांमध्ये पाणी साठते आणि सकाळी चेहरा सुजलेला किंवा फुगलेला दिसतो. झोपण्यापूर्वी चांगले हायड्रेट करा आणि रात्री उशिरा अल्कोहोल किंवा जास्त सोडियम असलेले पदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. (स्रोत: पेक्सेल्स)
-
४. झोप कमी असणे: योग्य झोप न मिळाल्यास शरीरात तणाव वाढतो आणि त्यामुळे चेहऱ्यावर सूज येते व पाणी साचते. वारंवार जागं होणं जसं झोपेचे त्रास (स्लीप अॅप्निया) असल्यास चेहरा सुजतो. दररोज ७–८ तास चांगली झोप घ्या. झोपेत अडथळा येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.(स्रोत: पेक्सेल्स)
-
५. थायरॉईडची समस्या, सायनस किंवा किडनीचे विकार यामुळे रोज सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ शकते. अशा समस्या ओळखण्यासाठी आणि योग्य उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. जर चेहरा वारंवार सुजत असेल किंवा थकवा, वजन वाढणे, नाक बंद होणे असे इतर लक्षणंही असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधा. (स्रोत: पेक्सेल्स)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी