-
ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला विशेष स्थान आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे.
-
शनी जेव्हा राशी बदलतो, तेव्हा तो कोणता ना कोणता पाय धारण करतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे चार पाय सोने, चांदी, तांबे आणि लोखंड असतात.
-
शनीची ही पावले आपल्या स्थितीनुसार शुभ आणि अशुभ फळ प्रदान करतात. यापैकी तांब्याच्या पायाचा प्रभाव हा अत्यंत शुभ मानला जातो.
-
शनीने मीन राशीत तांब्याचा पाय घेऊन प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, हे गोचर ३ जून २०२७ पर्यंत राहणार आहे.
-
शनीदेव पुढील काही काळ एका राशीच्या कुंडलीत तांब्याच्या पावलांनी भ्रमण करत आहेत, ज्यामुळे एका राशीच्या जीवनात मोठ्या उलाढाली होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या पुढील दोन वर्षांत काय बदलणार त्या राशीमध्ये…
-
शनीच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींवर कामाचा अधिक ताण जाणवू शकतो. ऑफिसमधील वातावरणात बदल होऊ शकतात, नवी जबाबदारी मिळू शकते.
-
मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. कष्टाचे फळ मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता असूनही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा अन्यथा नुकसान होऊ शकतो.
-
मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध या काळात चांगलं राहू शकते. अविवाहितांना विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी समजुतीने घेतलेले निर्णय सुखद ठरु शकतात.
-
आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. त्वचारोग, यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. आहार व जीवनशैलीत शिस्त पाळा.
-
शनीच्या तांब्याच्या पायामुळे कुणाचं नशीब उजळेल, कुणाला जबाबदाऱ्या वाढतील तर कुणी आत्मविश्वासाने नवीन टप्पा गाठेल. मात्र एक नक्की, मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे…!
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Israel Iran Conflict : इराणचा इस्रायलवर पलटवार! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे; आयर्न डोम फेल?