-
सकाळी डब्यासाठी कोणती भाजी बनवायची हा प्रश्न जेवण बनवणाऱ्या प्रत्येकासमोर असतोच. नेहमी भेंडी, कोबी, गवार, वांग आणि अगदी आवडता बटाटा अशा पटकन होणाऱ्या भाज्यांच आपण डब्याला देतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर तुम्हाला एखादी नवीन भाजी डब्याला द्यायची असेल. तर आम्ही तुमच्यासाठी खास पर्याय घेऊन आलो आहोत. आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत. भाजी कापताना हात काळे होतात असा अनेकदा प्रत्येक जण कारण देऊन मोकळे होतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचा खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आज आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत…
-
पाव किलो तोंडली मार्केटमधून आणा, स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक कापून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कांदा, टोमॅटो चिरून घ्या आणि ओलं खोबरं किसून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कढईत तेल घ्या आणि त्यात राई, जिरं, कडीपत्ता घाला. त्यात कांदा, आलं-लसूणची पेस्ट घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कांदा परतून घ्या आणि हळद, मीठ आणि तिखट मसाला त्यात घाला. तेल सुटल्यानंतर तेंडली घाला. थोडं परतवून घेतल्यावर खोबरं घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर १० ते १५ मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्या. (टीप : पाणी अजिबात घालू नका. ) (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अशाप्रकारे तेंडलीची भाजी तयार. (फोटो सौजन्य: @@SwarasArt/ युट्युब)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”