-
निरोगी आयुष्यासाठी योग अत्यावश्यक आहे. हे केवळ शरीराला सक्रियच ठेवत नाही, तर लवचिकता आणि ताकदही वाढवते. रोजच्या योग सरावाने तंदुरुस्ती टिकते. ‘मत्स्यासन’ हे त्यातील एक उपयुक्त आसन आहे. ‘मत्स्य’ म्हणजे मासा आणि ‘आसन’ म्हणजे मुद्रा. या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो, पोट स्वच्छ राहतं आणि घसा व डोळ्यांनाही आराम मिळतो.
-
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, मत्स्यासन हे बद्धकोष्ठता, पाठदुखी आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी उपाय आहे. हे आसन पचनसंस्था सुधारते, फुफ्फुसे उघडते आणि पाठीला आराम देते. नियमित सरावाने शरीर लवचिक आणि हलकं वाटतं.
-
मत्स्यासन पोटाच्या स्नायूंवर थेट परिणाम करून चरबी कमी करण्यात मदत करते. फिटनेससाठी हे एक सोपं पण प्रभावी योगासन आहे.
-
महिलांसाठी वरदान ठरणारे मत्स्यासन!
मत्स्यासन गर्भाशयाच्या तक्रारी, मधुमेह आणि मासिक पाळीतील वेदना कमी करण्यात मदत करते. हे हार्मोन संतुलन साधून महिलांचे आरोग्य सुधारते. -
मत्स्यासन : मनासाठीही रामबाण उपाय!
तणाव, चिंता आणि भीती दूर करण्यासाठी मत्स्यासन उपयुक्त ठरते. शांत श्वास आणि सुलभ मुद्रा मनाला स्थिरता देतात आणि मानसिक ताकद वाढवतात. -
मत्स्यासन कसे करावे? सोप्या पद्धतीने जाणून घ्या!
मत्स्यासन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही पाय एकत्र ठेवा. हात हळूवार शरीराखाली सरकवा आणि कोपरे कंबरेजवळ आणा. आता पाय ओलांडून, दीर्घ श्वास घेत छाती वर उचला आणि डोके मागे झुकवा, डोक्याचे टोक जमिनीला हलकं स्पर्श करेल अशा प्रकारे. योगाची ही साधी कृती आरोग्यासाठी प्रभावी ठरते.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक