-
आजच्या धावपळीच्या डिजिटल जगात मन:शांती आणि शारीरिक स्थिरता मिळविण्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही. फक्त काही मिनिटे, काही प्रभावी योगासनं – आणि तुम्ही पुन्हा ताजेतवाने होऊ शकता.
तणाव, चिंता, थकवा किंवा शरीरातील ताण– काही सहज करता येण्याजोगी योगासनं हे सगळं दूर करण्याची ताकद ठेवतात. मग तुम्ही अनुभवी योगप्रेमी असाल किंवा नवशिके– ही आसनं तुमचा मूड सुधारतात, शरीर शांत करतात आणि श्वासाशी असलेलं तुमचं नातं पुन्हा घट्ट करतात.
HereNow Official च्या फिटनेस व वेलनेस सल्लागार साधना सिंह म्हणतात, “योग हा मन आणि शरीर पुन्हा उभं करण्याचा मार्ग आहे. काही आसनं तुमच्यात सहजता, संतुलन आणि हलकेपणाची भावना निर्माण करतात.”
खाली अशाच १० फील-गुड योगासनांची यादी दिली आहे – जी सर्वांसाठी उपयुक्त असून, शरीर व मन अशा दोन्हींना नवे बळ देतात.(स्रोत: फ्रीपिक) -
बालासन
शांततेसाठी उत्तम आसन! हे विश्रांतीदायक पोज असलेलं आसन मज्जासंस्थेला शांत करतं, पाठीच्या खालच्या भागातील ताण कमी करतं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. सक्रिय आसनांमधून विश्रांती घेण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. (स्रोत: फ्रीपिक) -
अधोमुख स्वानासन
संपूर्ण शरीराला स्ट्रेच देणारं आसन! हे पाठीचा कणा, हात-पाय ताणतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरात स्फूर्ती निर्माण करतं. सौम्य उलट स्थितीमुळे मेंदूला ताजेपणा मिळतो. -
भुजंगासन
पाठीसाठी बूस्टर! हे बॅकबेंड आसन छाती खुलं करतं, पाठीचा कणा मजबूत करतं आणि बसून राहण्यामुळे होणारा ताण कमी करतं. पोटाच्या अवयवांसाठीही फायदेशीर आहे. (स्रोत: फ्रीपिक) -
सेतू बंधासन
चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त! ही पोज नितंब आणि मांड्या सक्रिय करतं. तसेच पाठीच्या खालच्या भागाचा त्रास कमी करतं आणि मन शांत करतं. सौम्य चिंता असलेल्या व्यक्तींना विशेष मदत करतं. (स्रोत: फ्रीपिक) -
मार्जरासन – बिटिलासन
पाठीचा कणा लवचिक आणि हलका ठेवण्यासाठी हे उत्तम आसन आहे. त्यामुळे मानेसह पाठीचा ताण कमी होतो. तसेच श्वासावरील नियंत्रण सुधारतं आणि शरीर उबदार होतं. (स्रोत: फ्रीपिक) -
विपरीता करणी (पाय भिंतीवर मुद्रा)
थकलेल्या पायांसाठी जादू! या उलट स्थितीत विश्रांती मिळते, सूज कमी होते आणि मन शांत राहतं. दिवसभरानंतर आराम मिळवण्यासाठी हे उत्तम आसन आहे.(स्रोत: फ्रीपिक) -
ताडासन
साधं; पण प्रभावी! शरीराची स्थिती सुधारतं, संतुलन वाढवतं आणि लक्ष केंद्रित करतं. मणक्याचं संरेखन योग्य ठेवतं आणि मन व शरीर यांना जोडतं. (स्रोत: फ्रीपिक) -
सुप्त मत्स्येंद्रासन
सौम्य वळणामुळे पाठीचा ताण कमी होतो, पचन सुधारतं आणि शरीर डिटॉक्स होतं. छाती आणि खांद्यांनाही आराम मिळतो. झोपेआधी करण्यासाठी योग्य आसन. (स्रोत: फ्रीपिक) -
उत्तानासन
हे सौम्य आसन पाठीचा ताण कमी करतं, हॅमस्ट्रिंग्ज ताणतं आणि मन शांत करतं. श्वासावर लक्ष दिल्यास तणाव आणि थकवा लवकर निघून जातो. आतल्या शांततेची सुरुवात इथूनच. (स्रोत: फ्रीपिक) -
शवासन
सर्व आसनांतील शेवटचं; पण सगळ्यात महत्त्वाचं! शरीर आणि मन दोघांनाही पूर्ण विश्रांती मिळते. हे आसन संपूर्ण सरावाचे फायदे आत्मसात करतं आणि मानसिक स्पष्टता वाढवतं. (स्रोत: फ्रीपिक)

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला