-
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्मरणशक्ती तीव्र असणं खूप गरजेचं आहे. शरीरासाठी जसा योग्य आहार महत्त्वाचा असतो, तसाच तो मेंदूसाठीही असतो. काही खास अन्नपदार्थ तुमचं मेंदूचं आरोग्य सुधारून लक्ष आणि स्मरणशक्ती वाढवू शकतात. जाणून घ्या असे ते पदार्थ.
-
बेरीज – मेंदूचे रक्षक
ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे मेंदूचं नुकसान टाळतात आणि स्मरणशक्ती वाढवतात. -
कॉफी – जागृततेसाठी उत्तम
कॉफीमधील कॅफिन सतर्कता वाढवते आणि लक्ष केंद्रित ठेवायला मदत करते. अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे आरोग्य राखतात. मात्र, कॉफी माफक प्रमाणातच प्यावी. -
डार्क चॉकलेट – मेंदूसाठी गोड ट्रीट
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉइड्स, कॅफिन व अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढवून स्मरणशक्ती सुधारतात. कमी साखर असलेले चॉकलेट निवडा. -
चरबीयुक्त मासे – ओमेगा-३ चा खजिना
सॅल्मन, ट्राउट, सार्डिन यांसारखे मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिडने भरलेले असतात. हे घटक मेंदूच्या पेशींचे कार्य आणि स्मरणशक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. -
अंडी – स्मरणशक्तीसाठी उपयुक्त
अंड्यांमध्ये कोलीन भरपूर असतो, जो मेंदूतील स्मृती आणि शिकण्यास मदत करणाऱ्या रसायनासाठी आवश्यक आहे. -
नट्स – मेंदूला व्हिटॅमिन ईचा सपोर्ट
अक्रोड, बदाम व काजूमध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स व चांगली चरबी असते. हे घटक वयामुळे होणाऱ्या स्मरणशक्तीतील घट कमी करतात. -
संपूर्ण धान्ये – मेंदूसाठी स्थिर ऊर्जा
ओट्स, तपकिरी तांदूळ व संपूर्ण गव्हाचा ब्रेड यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स हळूहळू ऊर्जा देतात, ज्यामुळे लक्ष आणि स्मरणशक्ती टिकून राहते. -
ग्रीन टी – शांतता आणि एकाग्रतेसाठी
ग्रीन टीमध्ये असलेले एल-थियानिन मेंदूला शांत ठेवते आणि लक्ष केंद्रित करायला मदत करते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे संरक्षण करतात.

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया