-
निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी, आहारात भरपूर प्रथिने आणि लोहयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे, कारण प्रथिने शरीरातील एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळते. स्नायू, हाडे, त्वचेसाठी मुख्य घटक आहे. प्रथिनांचे मुख्य काम शरीराची झीज भरून काढणे आणि नवीन पेशी तयार करणे आहे. ते एंजाइम आणि हार्मोन्स म्हणून देखील कार्य करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. (फोटो – फ्रीपिक)
-
केल्ली मॅकग्रेन या एक नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि लेखिका आहेत ज्यांच्याकडे आरोग्याशी संबंधित माहिती लिहिण्याचा आणि संपादित करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी शाकाहारी लोकांसाठी प्रथिनेयुक्त आहाराची यादी तयार केली आहे. (फोटो – फ्रीपिक)
-
केल्ली मॅकग्रेन यांच्या मते, बहुतेकदा असे मानले जाते की प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी अंडी, चिकन किंवा मासे आवश्यक असतात, परंतु, शाकाहारी लोक अंडी किंवा मांसाशिवायही भरपूर प्रथिने मिळवू शकतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर आहारात काही पदार्थ समाविष्ट करून प्रथिनांची कमतरता भासणार नाही. त्यांनी सांगितले की असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत जे अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने देऊ शकतात. (फोटो – फ्रीपिक)
-
टोफू : टोफू हे शाकाहारी आणि व्हीगन प्रथिनांचे एक पॉवरहाऊस आहे. पनीरच्या प्रत्येक पदार्थातील पनीर वगळून तुम्ही टोफूचा वापर करू शकता. टोफू खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतील. (फोटो – फ्रीपिक)
-
बदाम : बदामामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, परंतु ते हृदयासाठी निरोगी फॅट आहे. हे फॅट तुम्हाला पोट भरण्यास मदत करतात. बदामामध्ये प्रथिने देखील मोठ्या प्रमाणात असतात. (फोटो – फ्रीपिक)
-
बीन्स : काळ्या बीन्स किंवा इतर कोणत्याही बीन्सकडे प्रथिनांचा स्रोत म्हणून पाहता येईल. बीन्स हे पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहेत. अर्धा कप शिजवलेल्या काळ्या बीन्समध्ये ८ ग्रॅम प्रथिने असतात. इतर बीन्समध्येही तेवढीच प्रथिने असतात. अर्धा कप मसूरच्या डाळीमध्ये ९ ग्रॅम, चण्यामध्ये ८ ग्रॅम आणि राजमामध्ये ८ ग्रॅम प्रथिने असतात. (फोटो – फ्रीपिक)
-
क्विनोआ : प्रथिनांच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी क्विनोआ हा एक उत्तम पर्याय आहे. क्विनोआ हे एक दुर्मिळ पूर्ण वनस्पती-आधारित प्रथिने देणारा पदार्थ आहे. यात सर्व आवश्यक अमीनो आम्ल आहे. ते प्रति कप ५ ग्रॅम फायबर प्रदान करते आणि लवकर शिजते. शिजवलेल्या क्विनोआच्या एका कपमध्ये ८ ग्रॅम प्रथिने असतात. (फोटो – फ्रीपिक)
-
ग्रीक योगर्ट : ग्रीक योगर्ट साध्या दह्यापेक्षा अधिक प्रथिने असतात. प्रोबायोटिक नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. (फोटो – फ्रीपिक)
-
पीनट बटर : पीनट बटर टोस्ट, नूडल्स, स्मूदी आणि अगदी ओटमीलमध्येही चांगल्या प्रमाणात प्रथिने प्रदान करते. दोन टेबलस्पून पीनट बटरमध्ये ८ ग्रॅमपेक्षा अधिक प्रथिने असतात. (फोटो – फ्रीपिक)
-
चणा पास्ता : चणा पास्ता नेहमीच्या गव्हाच्या पास्त्यासारखा नसतो. यात अधिक पोषख तत्वे असतात. हा देखील प्रथिनांचा मोठा स्त्रोत आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस गुजराती)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान