-
प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे असं व्यक्तिमत्त्व, जे लोकांच्या मनावर प्रभाव टाकतं. ते नैसर्गिक असू शकतं; पण थोडे प्रयत्न आणि सकारात्मक सवयी अंगीकारल्यास कोणीही आपलं व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवू शकतो. खाली दिलेले नऊ सोपे आणि उपयोगी उपाय तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी मदत करतील: (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
आत्मविश्वास वाढवा
तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं सर्वांत मोठं शस्त्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्णय घेताना घाबरू नका. आत्मविश्वासानं बोलल्यास समोरच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
हसतमुख आणि आनंदी राहा
चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. हसतमुख पाहिलं की, लोकांना तुमच्याशी बोलावंसं वाटतं. नकारात्मक विचार कमी करा आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
इतरांचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐका
फक्त बोलणं नाही, तर ऐकणंही खूप महत्त्वाचं असतं. समोरची व्यक्ती काय बोलतेय हे लक्ष देऊन ऐका. त्यामुळे तुम्ही समजूतदार आणि विश्वासार्ह व्यक्ती वाटता. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
स्वतःच्या कपड्यांवर लक्ष ठेवा
स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसंगानुसार कपडे परिधान करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं एक छान इम्प्रेशन तयार होतं. ट्रेंडी नको; पण व्यवस्थित आणि तुम्हाला शोभणारे कपडे निवडा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
वेळेचं महत्त्व समजा
समयपालन ही एक अतिशय चांगली सवय आहे. वेळेवर पोहोचणं, काम वेळेत पूर्ण करणं यांमुळे तुमच्यावर विश्वास ठेवला जातो आणि व्यावसायिक व वैयक्तिक संबंध सुधारतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
आपल्या देहबोलीकडे लक्ष द्या
बोलण्याइतकंच तुमच्या देहबोलीलाही महत्त्व आहे. उभं राहण्याची पद्धत, चालण्यातला आत्मविश्वास, नजरेला नजर भिडवून या सर्व बाबी तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवण्यास साह्यभूत ठरतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
नम्रता आणि आदर ठेवा
इतरांच्या मतांचा आदर करा, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी नम्रतेनं वागा. या गोष्टींमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसायला लागतं आणि लोक तुमच्याशी सहजतेनं जोडले जातात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
ज्ञान वाढवा आणि अपडेटेड रहा
नवीन गोष्टी जाणून घ्या, वाचा, शिका. माहिती असलेली व्यक्ती अधिक आत्मविश्वासानं संवाद साधू शकते आणि कोणत्याही विषयावर मोकळेपणानं बोलू शकते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
नेहमी स्वतःसाठी वेळ काढा
स्वतःला वेळ द्या, स्वतःचं मूल्य समजा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःची काळजी घेता, तेव्हा ते तुमच्या व्यक्तिमत्त्वात सहजतेनं दिसून येतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’