-
चाणक्यांनी मांडलेली तत्त्वे आजच्या काळातही जीवनाला योग्य दिशा दाखवतात.
-
जरी चाणक्य युगांपूर्वीचे विचारवंत होते, तरीही त्यांचे विचार आजच्या युगातही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान आणि अनुभव आजच्या तरुणांनीही अवश्य समजून घ्यावेत, असे आहेत.
-
चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, तारुण्य ही अशी वेळ असते, जिथे घेतलेले निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आधार बनतात. या काळात चुकल्यास, संधी पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही.
-
१. वेळेचा अपव्यय – यशाचा सर्वांत मोठा शत्रू
चाणक्य म्हणतात, “वेळेचं व्यवस्थापन हे यशाचं मूळ आहे.” जो तरुण वेळ वाया घालवतो, तो भविष्यात कितीही मेहनत केली तरी मागेच राहतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
२. फक्त नशिबावर अवलंबून राहणे – अपयशाला निमंत्रण
चांगलं नशिब असणं महत्त्वाचं आहे; पण त्यावरच अवलंबून राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. मेहनत आणि कौशल्याशिवाय यश अशक्य आहे, असं चाणक्य सांगतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
३. वाईट संगती – यशातील मोठा अडथळा
वाईट सवयी आणि चुकीची मैत्री माणसाला विनाशाकडे नेऊ शकते; तर चांगली संगत हा यशाकडे नेणारा खरा मार्ग आहे, हे चाणक्य वारंवार बजावतात. (Photo : Freepik) -
४. भविष्याचा विचार न करणं – निष्काळजीपणाचं मोठं नुकसान
तारुण्य म्हणजे फक्त मजा करण्याचा काळ नाही, तर भविष्य घडवण्याची संधी आहे. जो तरुण विचार न करता जगतो, तो शेवटी परिस्थितीपुढे हतबल होतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
५. शिस्तीचा अभाव – यशाच्या मार्गातील अडथळा
चाणक्यांच्या मते, शिस्त ही कोणत्याही यशस्वी माणसाची पहिली ओळख असते. शिस्तीशिवाय कौशल्य, मेहनत व बुद्धिमत्ता हेसुद्धा निष्फळ ठरू शकतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”