-
टिळा – श्रद्धेचं प्रतीक
हिंदू धर्मात टिळा लावणं ही एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे. पूजा-अर्चा, सण, विवाह अशा अनेक शुभ प्रसंगी कपाळावर टिळा लावला जातो. हा टिळा केवळ सजावटीसाठी नाही, तर तो भक्ती, आस्था व दिव्यता यांचं प्रतीक आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
कपाळावर टिळा का लावतात?
आपल्या कपाळाच्या मधे एक खास जागा असते, जिथे शरीरातील तीन महत्त्वाच्या ऊर्जा रेषा (इडा, पिंगला व सुषुम्ना) एकत्र येतात. या जागेवर टिळा लावल्याने शरीरातली ऊर्जा नीटपणे कार्य करते. त्यामुळे मन शांत राहतं आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
स्त्रियांसाठी कुंकवाचा आध्यात्मिक अर्थ
स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. कारण- ते सौभाग्य आणि देवीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. हे केवळ सौंदर्यवर्धक नसून, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारंही आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
अज्ञ चक्राचं जागरण
कपाळावर टिळा लावण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे ठिकाण ‘अज्ञ चक्र’ किंवा ‘तिसरा नेत्र’ मानलं जातं, जे मन, स्मरणशक्ती व निर्णयक्षमता यांचं केंद्र आहे. टिळा लावल्यानं हे चक्र सक्रियरीत्या कार्यरत राहतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
तणाव कमी करणारा नैसर्गिक उपाय
टिळा लावल्यानं मेंदूतील मस्तिष्ककटी ग्रंथी सक्रिय होते, जी मेलाटोनिन सारखी शांतता देणारी रसायनं तयार करते. त्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि मानसिक तणाव कमी होतो. हा एक नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
चंदनाचा टिळा – थंडावा देणारा स्पर्श
चंदन लावल्यानं कपाळ थंड राहतं आणि मन शांत होतं. त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि ताजेतवानेपणाचा अनुभव येतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
कुंकवाचा टिळा – सौंदर्य आणि शुभतेचं प्रतीक
महिलांनी लावलेला कुंकवाचा टिळा सौभाग्य, ऊर्जा व आनंद यांचं प्रतीक असतो. तो जीवनात सकारात्मकता निर्माण करतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
भस्माचा टिळा – वैराग्य आणि ज्ञानाची दिशा
भस्म म्हणजे राख. शिवभक्त हे भस्म लावतात, जे सांसारिक गोष्टींपासून दूर राहून अध्यात्माकडे वाटचाल करण्याचं प्रतीक आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
हळदीचा टिळा – आरोग्य आणि समृद्धीचं चिन्ह
हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीचा टिळा लावल्यानं शुद्धता, चांगले आरोग्य व सौख्य यांची भावना प्रतीत होते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
टिळा लावण्याचे फायदे – मन, मेंदू आणि ऊर्जेचं संतुलन
टिळा लावल्याने मेंदू शांत राहतो, राग आटोक्यात राहतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. त्यामुळे मनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान