-
दाताचे दुखणे सुरू झाले की कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. दातांमुळे कधीकधी डोकेदुखीदेखील सुरू होते. खरं तर, दातदुखीची अनेक कारणे असू शकतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
कधीकधी जेवताना दातांमध्ये काहीतरी अडकल्यामुळे वेदना होऊ शकतात किंवा कधी कधी दाताला कीड लागल्यामुळेही वेदना होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तसेच काही लोकांना गरम किंवा थंड पदार्थ खाताना वेदना होतात. दातांचे दुखणे वाढू लागले की, अनेकांच्या चेहऱ्यावरही सूज दिसते.
-
अशा परिस्थितीत सुरुवातीलाच काही घरगुती उपाय करून पहावेत. जर आराम मिळाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(फोटो सौजन्य: Freepik) -
दातदुखी असलेल्यांसाठी अकरकरा खूप फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर अकरकराचे फूल चघळल्यास तोंड शुद्ध होते. अकरकराची पावडर बनवून त्यात तुरटी आणि लवंग मिसळून टूथपेस्ट बनवा. या टूथपेस्टचा वापर केल्याने दातांच्या सर्व समस्या दूर होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
दातदुखी असलेल्यांसाठी अकरकरा खूप फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर अकरकराचे फूल चघळल्यास तोंड शुद्ध होते. अकरकराची पावडर बनवून त्यात तुरटी आणि लवंग मिसळून टूथपेस्ट बनवा. या टूथपेस्टचा वापर केल्याने दातांच्या सर्व समस्या दूर होतात.
(फोटो सौजन्य: Freepik)(फोटो सौजन्य: Freepik) -
जर तुम्हाला दातदुखी असेल तर कोमट पाण्यात मीठ घालून चूळ भरा. यामुळे केवळ वेदना कमी होतातच असे नाही तर दातांमध्ये अडकलेली कोणतीही गोष्टदेखील काढून टाकली जाते. मिठाचे पाणी जंतुनाशक म्हणून काम करते. ते दातांमध्ये अडकलेले जंतूदेखील मारते, यामुळे दातांच्या नसांमधील वेदना कमी होतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
दातांमध्ये खूप वेदना होत असतील तर दाताखाली एक लवंग ठेवा आणि हळूहळू दाताने ती लवंग दाबा. यामुळे लवंगचा रस दातामध्ये जाईल, ज्यामुळे तुमची दातदुखी कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य: Freepik)
-
दातदुखी कमी करण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. दाताखाली लसूण ठेवल्यास दातदुखी कमी होण्यास मदत होईल. तसेच याव्यतिरिक्त तुम्ही हळद, मीठ किंवा राईच्या तेलाची पेस्टदेखील दुखणाऱ्या दातावर लावू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान