-

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. अश्विन अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दिवशी धन-संपत्ती आणि आयुष्यात सुख, शांती, समृद्धी देणाऱ्या देवी लक्ष्मीची लोक यथाशक्ती पूजा-आराधना करतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला विविध नैवेद्य अर्पण करतात, तिच्या आवडीचे मंत्र, स्तोत्र म्हणतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
यंदा २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल. ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहे ज्यांच्यावर सदैव देवी लक्ष्मीची असीम कृपा असते, त्यामुळे लक्ष्मी पूजनाचा काळ त्या राशीच्या व्यक्तींसाठी नक्कीच लाभदायी असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क रास ही देवी लक्ष्मी खूप प्रिय रास आहे. कारण, या राशीचा स्वामी ग्रह चंद्र असून चंद्राला देवी लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाचा काळ कर्क राशीला देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीवरही देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यामुळे या राशीच्या जीवनात अनेक प्रकारच्या आनंदाचे क्षण येतील. नवीन काम आणि व्यवसायासाठी हा काळ खूप शुभ आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीवरही देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न असतात. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या काळात भरपूर पैसे कमावण्याव्यतिरिक्त, तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवू शकता. कामाच्या संदर्भात तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता, यामुळे तुम्हाला भविष्यात बरेच फायदे मिळू शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आता नुसता पैसाच पैसा! दिवाळीपासून व्यवसायात होणार भरपूर प्रगती ‘या’ तीन राशींच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणार
Diwali 2025 Horoscope: यंदा २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल. ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहे ज्यांच्यावर सदैव देवी लक्ष्मीची असीम कृपा असते.
Web Title: Form diwali 25 these three zodic sign will be lucky sap