-
दूध घेतल्यामुळे काहींना सूक्ष्म किंवा गंभीर पचन आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. ही सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतल्यास तुम्हाला समजेल की दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आरोग्याला उपयोगी ठरण्यापेक्षा नुकसानदायी ठरत आहेत. दूध तुमच्यासाठी योग्य नाही, याची सहा लक्षणे जाणून घ्या. (Source: Photo by Unsplash)
-
पोट फुगणे आणि गॅस: जेव्हा तुमचे शरीर दुधातील नैसर्गिक साखर, लॅक्टोज पचवण्यास संघर्ष करत असते तेव्हा पोट फुगणे आणि जास्त गॅस होण्याची सर्वात सामान्य लक्षणे उद्भवतात. (Source: Photo by Unsplash)
-
रक्तसंचय आणि श्लेष्मा: दूध प्यायल्यानंतर जर तुम्हाला वारंवार नाक बंद होणे, घशातील श्लेष्मा किंवा सायनसच्या समस्या येत असतील तर याचा अर्थ ते तुमच्या शरीरातील दुग्धजन्य प्रथिनांवर प्रतिक्रिया देत आहे. (Source: Photo by Unsplash)
-
वारंवार डोकेदुखी: केसीन सारखे संवेदनशील दुग्धजन्य प्रथिने कधीकधी डोकेदुखी किंवा मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतात. विशेष करून ज्यांना एलर्जीचा जास्त त्रास होतो. (Source: Photo by Unsplash)
-
थकवा किंवा मेंदूला झिणझिण्या: दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोकांमध्ये आळशीपणा किंवा मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असल्याचे बोलले जाते. कदाचित ऍलर्जीक प्रतिक्रियांमुळे असे होत असावे. (Source: Photo by Unsplash)
-
काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर चेहऱ्यावर मुरुम आणि त्वचेच्या जळजळीशी जोडली गेलेली एलर्जी जाणवते. विशेषतः दुधात आढळणाऱ्या हार्मोन्स आणि बायोएक्टिव्ह रेणूंमुळे हे होत असते. (Source: Photo by Unsplash)
-
दूध प्यायल्यानंतर लगेचच पोटात पेटके येणे, मळमळ होणे किंवा जुलाब होणे या समस्या जाणूव शकतात. तुमच्या शरीरात पुरेसे लॅक्टोज तयार होत नसल्याचे हे निदर्शक असू शकते. (Source: Photo by Unsplash)
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध