-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
लवकरच २०२६ हे नवे वर्ष सुरू होईल, या वर्षात गुरू दोन वेळा राशी परिवर्तन करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, गुरू २ जून २०२६ रोजी गुरू कर्क राशीत आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. गुरूचे २०२६ मध्ये दोन वेळा होणारे हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच लाभकारी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!