-

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.
-
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र २० डिसेंबर सकाळी ७ वाजून ५० रोजी गुरूच्या धनु राशीत प्रवेश करणार आहेत.
-
शुक्राचे हे गोचर २०२५ मधील शेवटचे गोचर असेल. या राशीत शुक्र १३ जानेवारी २०२६ पर्यंत उपस्थित राहील.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
-
शुक्राचे राशी परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. -
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
एक महिन्यानंतर शुक्राचे २०२५ मधील शेवटचे गोचर, ‘या’ राशींना मिळणार नोकरीत बढती अन् बँक बॅलन्समध्ये घसघसशीत वाढ
Shukra Dhanu Rashi Gochar 2025: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र २० डिसेंबर सकाळी ७ वाजून ५० रोजी गुरूच्या धनु राशीत प्रवेश करणार आहेत.
Web Title: Shukra rashi gochar 25 dhanu kumbha and vrushabh zodic increase bank balance and healthy wealthy lifestyle sap