-

थंडीमध्ये दही खावे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की थंडीमध्ये दह्याचे सेवन केल्यास ताप, सर्दीसारखे आजार होऊ शकतात. पण, तज्ज्ञांच्या मते हे हानिकारक ठरत नाही.
-
तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दही खात असाल तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक नाही, तर उलट लाभदायक ठरते.
-
दही खाण्याचे फायदे दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन तंत्र मजबूत करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. थंडीमध्ये दही खाल्ल्यास शरीराला आजारांपासून बचावासाठी ऊर्जा मिळते.
-
योग्य वेळ थंडीमध्ये दिवसा दही खाल्ल्यास फायदेशीर ठरते. खासकरून दुपारी जेवणात दही खाण्याने जास्त फायदा होतो. दुपारी जेवणात दही खाल्ल्याने अन्न लगेच पचते आणि शरीराला ताकदही मिळते.
-
काळजी घ्या दही थंडीत खाणं हानिकारक नसले तरी रात्री जास्त थंड दही खाणे ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकते. दही जास्त थंड खाऊ नये. दह्यामध्ये काळी मिरी टाकल्यास त्यातील थंडावा कमी होतो आणि ते अधिक गुणकारी ठरते.
-
जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असेल तर दही खाणे टाळावे; नाहीतर त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
-
योग्य प्रमाण दही योग्य प्रमाणातच खावे. दिवसातून दोन छोट्या वाट्या दही शरीरासाठी पुरेसे आहेत. जास्त प्रमाणात दही खाल्ल्यास पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
-
(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
-
(सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
हिवाळ्यात दही खाल्ल्यावर काय होऊ शकते; जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ
Winter Yogurt Benefits and Precautions: हिवाळ्यात थंड हवामान असल्याने खाण्यापिण्याबाबत अनेकदा गोंधळ निर्माण होतो. अनेकांना वाटते की थंडीत दही खाणे हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात दही खाणे हानिकारक आहे की आरोग्यदायी.
Web Title: What happens when you eat yogurt in winter best time to eat yogurt health tips svk 05