-
योग केवळ शरीर लवचिक ठेवत नाही तर आपल्या अंतर्गत अवयवांनाही मसाज देऊन रक्ताभिसरण सुधारतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो. मन शांत ठेवतानाच ही आसने पचनक्रिया सुधारण्यात मदत करतात. चला जाणून घेऊ या, सहा उपयुक्त योगासनांविषयी — (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
अपानासन (Apanasana) हे साधं पण प्रभावी आसन पोटातील वायू आणि फुगेलपणा कमी करण्यास मदत करतं. पोटावर हलका दाब येतो आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. जेवणानंतर हे आसन केल्यास पचन सुलभ होतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
अर्ध मत्स्येन्द्रासन (Ardha Matsyendrasana) बसून केलेलं हे ट्विस्टिंग आसन पचनक्रिया सुधारतं. पोटातील अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढवून यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासही हे उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
बलासन (Balasana) हे शांत आणि आरामदायक आसन पोटावर हलका दाब देऊन पचनसंस्थेला विश्रांती देते. पोटदुखी, क्रॅम्प्स आणि ताण कमी करून मनाला शांतता प्रदान करतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
वायू मुक्तासन (Pavanamuktasana) या आसनाचं नावच सांगतं – शरीरातील अडकलेला वायू बाहेर टाकण्यासाठी हे उत्कृष्ट आहे. बद्धकोष्ठतेत (कॉन्स्टिपेशन) आराम मिळतो आणि कमरेच्या स्नायूंनाही शिथिलता मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
सेतू बंधासन (Setu Bandhasana) या आसनात शरीराचा वरचा भाग उचलल्यामुळे पोटाचे स्नायू आणि थायरॉइड ग्रंथी सक्रिय होतात, त्यामुळे पचन सुधारतं आणि आम्लपित्त (अॅसिडिटी) कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
त्रिकोणासन (Trikonasana) उभं राहून केलं जाणारं हे स्ट्रेचिंग आसन पोटातील अवयवांना सक्रिय करतं, त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, पचनक्रिया सुलभ होते आणि शरीराची पोश्चर व संतुलन क्षमता वाढते. (टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी