-
भारताची प्रसिद्ध कथावाचिका आणि प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी यांनी विवाहित आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लोकांबाबत महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, अनेक नाती स्वतःच नष्ट होतात, कारण त्यामध्ये समज आणि संयमाचा अभाव असतो.
-
एका यूट्यूबरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “ब्रेकअप किंवा रिलेशनशिपच्या अडचणी हाताळणं हे दुसरं पाऊल आहे; पण पहिलं म्हणजे त्या नात्यात व्यवस्थित राहणं.” जर नातं समजून घेतलं, तर ब्रेकअपपर्यंत गोष्टच पोहोचत नाही.
-
निर्णय घेण्याआधी एकमेकांना वेळ द्या जया किशोरींच्या मते, आजकाल लोकांना कोणी आवडलं की लगेच रिलेशनशिपमध्ये येतात, लग्न करतात आणि काही काळानंतर निर्णयावर पश्चात्ताप करतात; त्यामुळे त्या सल्ला देतात की, एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घ्या आणि मगच पुढचं पाऊल टाका.
-
जबाबदाऱ्या आणि मानसिकता समजून घ्या त्या सांगतात की, मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही एकमेकांच्या जबाबदाऱ्या, विचारसरणी आणि मानसिकतेची ओळख असणं फार गरजेचं आहे. दुसऱ्याचं वागणं, बोलणं, विचार करण्याची पद्धत काय आहे हे समजायला वेळ लागतो, त्यामुळे नात्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ही समज आवश्यक आहे.
-
‘लव्ह इज नॉट ब्लाइंड, अट्रॅक्शन ब्लाइंड असतं’ त्यांच्या मते, कोणाचं खरं रूप किंवा असलियत समोर यायला वेळ लागतो, त्यामुळे पार्टनरला ओळखण्यासाठी वेळ द्या आणि नात्यात असताना डोळे उघडे ठेवा. त्या म्हणतात, “लव्ह इज नॉट ब्लाइंड, अट्रॅक्शन ब्लाइंड असतं.” खरं प्रेम नेहमी जागरूक असतं.
-
एकमेकांना दोष न देता स्वतःला सुधारा जया किशोरींच्या मते, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतात. कोणालाच दुसऱ्याला सुधारायला जायचं नसतं. एकमेकांवर गोष्टी थोपवण्यापेक्षा स्वतःच्या चुका ओळखून त्या सुधाराव्यात, अशाने नातं अधिक घट्ट आणि स्थिर होतं.
-
पार्टनरच्या भावनांना महत्त्व द्या शेवटी त्या सांगतात की, नातं सुखकर ठेवायचं असेल तर एकमेकांच्या आवडीनिवडी आणि गरजा समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या जोडीदाराला काय आवडतं आणि काय नकोय हे जाणून घेतलं तर नातं प्रेमळ आणि टिकाऊ होतं. (सर्व फोटो सौजन्य : जया किशोरी/फेसबुक)
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी