-
प्राचीन काळातील महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी चाणक्य (कौटिल्य) यांनी केवळ अर्थशास्त्र नव्हे तर चाणक्य नीती या ग्रंथाद्वारे जीवनाचे सत्यही मांडले आहे. त्यांच्या नीतिमत्तेत अनेक असे विचार आहेत, जे आजही जीवनासाठी तितकेच महत्त्वाचे मानले जातात.
-
चाणक्यांच्या एका श्लोकात त्यांनी सांगितले आहे की, माणसासाठी अशा सहा गंभीर परिस्थिती असतात ज्यात तो आगीशिवायही आतून जळतो.
-
श्लोक कुग्रामवासः कुलहीन सेवा कुभोजन क्रोधमुखी च भार्या। पुत्रश्च मूर्खो विधवा च कन्या विनाग्निमेते प्रदहन्ति कायम्॥
-
वाईट ठिकाणी राहणे
चाणक्यांच्या मते, ज्या गावात किंवा ठिकाणी वाईट लोक राहतात, तिथे राहणारा व्यक्ती एक दिवस त्यांच्यासारखा बनतो. त्यांच्या संगतीमुळे त्याचे विचार दूषित होतात आणि अशा वाईट सवयींमुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. -
अधम लोकांची सेवा
वाईट किंवा अधम स्वभावाच्या लोकांची सेवा करणारा माणूसही एके दिवशी संकटात सापडतो. अशा लोकांच्या सहवासामुळे माणूस स्वतःच नष्ट होतो आणि त्याचा त्रास त्याच्या कुटुंबालाही सहन करावा लागतो. -
निकृष्ट अन्नसेवन
अपौष्टिक किंवा निकृष्ट अन्न खाणारा माणूसही आतून हळूहळू जळतो. चाणक्य म्हणतात की अशा अन्नामुळे शरीर तर कमजोर होतेच, पण मनही अस्थिर बनते आणि जीवनात अशांती वाढते. -
क्रोधी पत्नी
ज्या व्यक्तीची पत्नी नेहमी रागात असते, प्रत्येक गोष्टीवर चिडते, त्या पुरुषाचे आयुष्य दु:खमय बनते. अशा क्रोधी पत्नीमुळे माणूस सतत तणावाखाली राहतो आणि त्याची मनःशांती हरवते, हेच त्याचे “आगीशिवाय जळणे” ठरते. -
मूर्ख पुत्र
चाणक्यांच्या मतानुसार, मूर्ख किंवा नासमज मुलामुळे वडिलांना नेहमीच वेदना भोगाव्या लागतात. अशा मुलाच्या वर्तनामुळे वडिलांची प्रतिष्ठा, कर्तृत्व आणि आनंद नष्ट होतो. -
विधवा मुलगी
ज्या व्यक्तीची मुलगी विधवा असते, त्याला आयुष्यभर दु:ख भोगावे लागते असे चाणक्य म्हणतात. मुलीच्या वेदना पाहून वडिलांचे मन सतत अस्वस्थ राहते आणि ते आतून हळूहळू कोसळत जाते.
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी