-
वेगाने बदलणारी जीवनशैली आणि धावपळीच्या जीवनात बहुतेक लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो. बरेच लोक झोपण्यापूर्वी जास्त विचार करत राहतात, ज्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मग रात्री रील स्क्रोल करणे, आवडत्या व्यक्तीशी गप्पा मारणे आदी अनेक गोष्टी करण्यात आपण आणखीन जास्त वेळ वाया घालवतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मग झोपेच्या या कमतरतेमुळे सकाळी उठायला होत नाही, झोप अपूर्ण राहिल्यामुळे थकवादेखील जाणवू लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जर तुम्हालाही रात्री जास्त विचार करत राहण्याची आणि झोप न येण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही पुढील काही पायऱ्या फॉलो करून अगदी शांतपणे झोपू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वेळ ठरवा – जास्त विचार केल्याने तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. झोप येत नाही आणि मनालाही योग्य विश्रांती मिळत नाही. जर तुम्हालाही या समस्येचा त्रास होत असेल, तर सगळ्यात आधी झोपण्याची एक ठराविक वेळ निश्चित करा. दररोज त्याच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्क्रीन टाइम कमी करा – मोबाईल, संगणक, टेलिव्हिजनचा सतत वापर निद्रानाशाचे एक प्रमुख कारण असू शकते. रात्री चांगली झोप येण्यासाठी, झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी या उपकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम करतो; ज्यामुळे झोप लागणे कठीण होऊन जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चहा आणि कॉफी पिणे टाळा – चहा किंवा कॉफी पिणे तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते, त्यामुळे दीर्घकाळापर्यंत झोप येत नाही. त्यातील कॅफिन तुमच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
योगा आणि ध्यान करा – झोपण्यापूर्वी योगा आणि ध्यान करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे मन शांत होते, चांगली झोप लागते; योगामुळे ताण कमी होतो. त्यामुळे दररोज फक्त १० ते १५ मिनिटे योग केल्यानेही तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी