-
ज्योतिष शास्त्रात नवग्रहांचे आणि नक्षत्रांचे गोचर अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर होतो.
-
सध्या नोव्हेंबर २०२५ सुरू असून २०२६ सुरू होण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. या नव्या वर्षात मोठ्या ग्रहांचे गोचर होईल.
-
पंचांगानुसार, २०२६ मध्ये शुक्रादित्य राजयोग, बुधादित्य राजयोग, महालक्ष्मी राजयोग आणि गजकेसरी राजयोग असे अनेक मोठे शुभ राजयोग निर्माण होतील.
-
हे राजयोग १२ राशीच्या व्यक्तींपैकी काही राशींसाठी अत्यंत अनुकूल आणि लाभदायी सिद्ध होतील. या राजयोगाच्या प्रभावाने २०२६ मध्ये काही राशीच्या जातकांचे नशीब बदलू शकते.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे राजयोग खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे राजयोग अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे योग अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
-
२०२६ मध्ये निर्माण होणारा राजयोग कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!