-
मूत्रपिंडांचं मुख्य कार्य म्हणजे शरीरातील रक्ताचं फिल्टरिंग करणं, रक्तदाब नियंत्रित करणं, शरीरातील सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांचं संतुलन राखणं. (Photo: Freepik)
-
जेव्हा मूत्रपिंड खराब होऊ लागतात तेव्हा शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होऊ लागतो, ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. काही सवयी अशा आहेत ज्या किडनीच्या नुकसानाला कारणीभूत ठरतात. (Photo: Freepik)
-
साखरेचं सेवन : अति प्रमाणात साखरेचं सेवन केल्यास मूत्रपिंडाच्या नुकसानाचा धोका वाढवतो. खरं तर जास्त साखरेचं सेवन मधुमेह होण्याचा धोकाही वाढवते, ज्याचा मूत्रपिंडांवरही परिणाम होतो. (Photo: Pexels)
-
मीठ : ज्यांना जास्त मीठ खाण्याची सवय आहे त्यांनी ते ताबडतोब थांबवावं. जास्त मीठ सेवन केल्याने रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो आणि हळूहळू मूत्रपिंडांनाही नुकसान पोहोचू शकतं. (Photo: Pexels)
-
औषधे : सर्दी, खोकला किंवा अगदी सौम्य तापासाठी बरेच लोक औषधे घेतात. परंतु ही सवय मूत्रपिंडांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. खरंतर औषधांमध्ये काही कण असतात जे मूत्रपिंड फिल्टर करू शकत नाहीत आणि हे कण हळूहळू मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवू लागतात. (Photo: Pexels)
-
लघवी रोखून ठेवणं : बऱ्याच लोकांना जास्त वेळ लघवी रोखून ठेवण्याची सवय असते. जास्त कामामुळे ते अनेकदा तासन्तास एकाच जागी बसून राहतात. परंतु जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशयात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे किडनीच्या संसर्गाचा धोका वाढतो. (Photo: Freepik)
-
कमी पाणी पिणं : किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. ते त्यांना स्वच्छ ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्हा हानिकारक विषारी पदार्थ जमा होऊ लागतात आणि ते बाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडांना जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणून नियमितपणे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. (Photo: Freepik)
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
