-
ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो.
-
चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. तर देवगुरूला ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते.
-
पंचांगानुसार, २७ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून १५० डिग्रीवर असतील, ज्यामुळे ‘षडाष्टक योग’ निर्माण होईल.
-
हा २०२५ मधील शेवटचा योग असेल, जो १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी असेल. -
मेष राशीसाठी षडाष्टक योग खूप खास असणार आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. धन संपत्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडीलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास दिसून येईल.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचा आठवडा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो.
-
वर्ष २०२५ च्या शेवटचा बुध आणि गुरूचा षडाष्टक योग कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक मानला जाईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभू शकते व्यवसायात मोठी योजना कामी येऊ शकते. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत