-
हिवाळा आल्यानंतर घराघरांत हिरव्या भाज्यांची लगबग वाढते. कारण- या ऋतूत शरीराला पोषण देणारे अनेक चमत्कार दडलेले असतात.
-
थंड हवेत ऊर्जा टिकविण्यासाठी काही भाज्या अतिशय गुणकारी मानल्या जातात. त्यातलेच एक हिरवे पान आपल्या तब्येतीचं हिवाळ्यात खास रक्षण करतं.
-
हाडं मजबूत ठेवण्यापासून ते दृष्टी सुधारण्यापर्यंत… ही भाजी अनेक विकारांसमोर आपली ढाल बनून उभी राहते.
-
डॉक्टर सांगतात, त्यात असणारी नैसर्गिक पोषक द्रव्यं शरीरातील कमतरता चुटकीसरशी भरून काढतात.
-
विशेष बाब म्हणजे बाजारात सहजपणे मिळणारी ही भाजी महागही नाही. साधारण १० रुपयांत मिळणारी ही हिरवी पानं म्हणजे आरोग्याचा खजिनाच.
-
त्यात असणारे आयर्न, कॅल्शियम व मॅग्नेशियम हे घटक शरीरातील थकवा घालवण्यास आणि रक्तातील कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
-
या पानांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यासारख्या हिवाळ्यातील तक्रारींपासून दूर राहणं शक्य होतं.
-
ही भाजी विशेषतः डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यात भरपूर प्रमाणात असणारी ए व सी ही व्हिटॅमिन्स दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
-
एवढेच नव्हे, तर ज्यांना हाडांचं दुखणं किंवा सांध्यांचा त्रास असलेल्यांनी तर ही भाजी आवर्जून खावी, असे तज्ज्ञ सांगतात.
-
शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करून हाडं मजबूत करणं, ही या साध्या हिरव्या पानांची मोठी ताकद आहे.
-
ही आरोग्यदायी भाजी म्हणजे ‘पालक’! होय… दैनंदिन स्वयंपाकात वापरला जाणारा साधासोपा पालक हिवाळ्यात शरीराचा सर्वोत्तम रक्षक ठरतो.
-
पालकाचा ज्यूस असो किंवा भाजी; त्याचं नियमित सेवन त्वचा, डोळे, हाडे आणि पचन या सर्वा आश्चर्यकारक परिणाम दाखवतं.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : Freepik)
“भारतात गेलो तरी आम्ही मरणारच आहोत”, दुबई सोडण्यास भारतीयांनी का नकार दिला?