-
ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात.
-
तसेच अनेकदा बुध ग्रह मार्गी किंवा अस्त होतात, त्याचाही शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. २०२६ मध्ये बुध ग्रह सात वेळा अस्त होणार आहे. -
पंचांगानुसार, बुध २ जानेवारी २०२६ ते ५ फेब्रुवारी या काळात अस्त असेल. त्यानंतर १ मार्च ते १८ मार्च २०२६ या काळातही बुध अस्त असेल, त्यानंतर बुध २७ एप्रिल ते २३ मे २०२६ अस्त असेल.
-
बुध ३० जून ते २५ जुलै २०२६ आणि १८ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२६ या काळतही अस्त असेल. त्यानंतर बुध ग्रह २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर आणि १४ डिसेंबर ते १९ जानेवारी या काळतही अस्त असेल. बुधाची ही अस्त स्थिती नक्कीच १२ पैकी काही राशींसाठी वरदान ठरेल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अस्त बुधाचा प्रभाव उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल.
-
बुधाच्या अस्त होण्याने राशीच्या कुंभ व्यक्तींसाठीही हा काळ भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील.
-
(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘Be The Man I Need…’, स्मृतीने लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्जची पोस्ट, VIDEOने वेधलं सर्वांचं लक्ष