-
हल्लीची पिढी नोकरीच्या मागे न लागता काहीतरी वेगळे करण्याचा मार्ग निवडते. सध्या ओरॅकल या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीतील एका तरूणीने असाच एक निर्णय घेतला आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
-
ओरॅकलमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या वनथी एस. नावाच्या तरूणीने पारंपरिक नोकरीत अडकण्याऐवजी पूर्णवेळ ट्रॅव्हल व्लॉगर होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
वनथी एस. मागच्या दशकभरापासून आपली ९ ते ५ या वेळेतील नोकरी सांभाळून ट्रॅव्हल व्लॉगिंग करत होती. या नोकरीत तिचा वार्षिक पगार ३० लाख रुपये इतका होता. मात्र अखेर तिने नोकरीला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला.
-
डेव्हलपर म्हणून काम करत असताना डेडलाइनचा तणाव आणि प्रमोशनचा पाठलाग करण्यात मी दशकहून अधइक काळ घालवला. या काळात मी बचत केली, जमीन घेतली, गावाला घर बांधले.
-
पण मी माझ्या अपेक्षा दाबून काम करत असल्याचे मला जाणवले. त्यानंतर मी आता नोकरी सोडून पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर होण्याचा निर्णय घेतला, असे वनथी एस.ने म्हटले.
-
वनथी एस.ने आपल्या निर्णयाबद्दल सांगताना म्हटले, जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा मला आराम, भीती आणि एका विचित्र भावनेने घेरले.
-
वर्षानुवर्षे, मी रोज ९ ते ५ काम करून आठवड्याच्या शेवटी प्रवास, ट्रेकिंग करत असे. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत एडिटिंग करत असे.
-
हळूहळू मला ही कसरत करण्याचा कंटाळा येऊ लागला. रोज रोज त्याच बैठका, तेच प्रेझेंटेशन मला कंटाळवाणे वाटू लागले. हे दुहेरी जीवन जगून मी थकले होते, त्याचा माझ्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला.
-
वनथी एस. चे इन्स्टाग्रामवर १.६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता ती पूर्णवेळ व्लॉगर होणार असली तरी काही वर्षांनी जर तिची योजना यशस्वी झाली नाही तर ती पुन्हा नोकरीतही परतण्याचा निर्णय घेणार आहे.
“लाज वाटली पाहिजे”, ‘भूत बंगला’च्या दिग्दर्शकाचे वक्तव्य; म्हणाले, “तब्बू अजिबात…”