-
पाणी हे जीवन आहे, त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा प्रत्येक ऋतूत आपल्याला पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देत असतात. पण, जास्त पाणी प्यायल्यावर शरीर हायड्रेट राहणे दूर, सतत लघवी होत राहते. ही समस्या आपल्यातील अनेकांना जाणवते. तर असं होऊ नये म्हणून नक्की काय करता येईल? याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर याबद्दल आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांनी एका यूट्यूब व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “जेव्हा तुम्ही साधे पाणी पिता तेव्हा ते तुमच्या शरीरातून खूप लवकर बाहेर निघून जाते. त्यामुळे फक्त साधं पाणी प्यायल्याने शरीराच्या पेशींना पुरेसं हायड्रेशन मिळत नाही. याउलट जर तुम्ही पाण्यात पुदिन्याची पाने, लिंबू घातलं तर त्यात सोडियम (मीठ) येतं, त्यामुळे पाणी शरीराच्या पेशींमध्ये जास्त वेळ टिकतं आणि तेव्हाच शरीर आतून खऱ्या अर्थाने हायड्रेट राहते; त्यामुळे सतत लघवीसुद्धा होत नाही, त्यामुळे तुमच्या दिनचर्येत साध्या पाण्याऐवजी डिटॉक्स वॉटरचे सेवन करण्याचा विचार करा, यामुळे शरीर हायड्रेट राहते.” (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मुंबईतील चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉक्टर भाविन पटेल यांच्याशी चर्चा केली. याबद्दल त्यांनीही सहमती दाखवत म्हटले की, २-३ लिटर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड होत नाही हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पाण्यात काय मिक्स करता यावरही हायड्रेशनची पातळी अवलंबून असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हायड्रेटेड राहणे आवश्यक असले तरी हायड्रेशनचा प्रकार आणि पद्धत या गोष्टींचा शरीरावर चांगला परिणाम होतो. तुम्ही पॉवर-पॅक्ड डिटॉक्स वॉटरचेदेखील सेवन करून पाहू शकता; जे तुम्हाला हळूहळू हायड्रेट करते. जसे की, पुदिन्याची पाने, लिंबाचे तुकडे, काकडी, तुळशीची पाने मिक्स करून बनवलेलं पाणी. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हे पाणी केवळ चव देत नाहीत तर पचनास मदतसुद्धा करते आणि पोटफुगीसुद्धा कमी होते. या सर्व पदार्थांमधील घटक हळूहळू पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स पाण्यात सोडतात; ज्यामुळे तुमचे शरीर द्रवपदार्थ अधिक स्थिरपणे शोषण्यास आणि बराच वेळ हायड्रेटेड राहण्यास मदत करते, असे डॉक्टर पटेल म्हणाले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
इतर पर्यायांमध्ये नारळ पाणी, बार्लीचे (जवस) पाणी आणि कॅमोमाइल किंवा हर्बल टी यांचा समावेश असतो, जे मूत्राशयासाठी सौम्य असतात आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. कॅफिन आणि कार्बोनेटेड पेये टाळा, ज्यामुळे मूत्राशयात जळजळ निर्माण होऊ शकते, असे डॉक्टर पटेल म्हणाले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२ ते ३ लिटर पाणी प्यायल्यानंतर लगेचच लघवीला जावंस वाटणे हे अनेक लोकांमध्ये खूप सामान्य गोष्ट आहे. असं तेव्हाच होतं, जेव्हा तुम्ही थोड्या वेळात खूप जास्त पाणी पिता किंवा तुमचा मूत्राशय थोडा सेन्सिटिव्ह असतो.
-
त्यामुळे काही जणांना जास्त पाणी लगेचच प्यायल्यावर लघवी होते आणि वारंवार बाथरूमला जावे लागते. त्यामुळे काही जणांना लाज वाटते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे एकदम खूप पाणी पिण्यापेक्षा दिवसभर थोडं-थोडं पाणी पित राहिलात तर सतत लघवी होणे ही समस्या टाळता येते. जर वारंवार लघवी होण्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर (ओएबी) किंवा मधुमेह यांसारखे आजार होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका. (फोटो सौजन्य: @Freepik)
बॉलीवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? अक्षय खन्नाने घेतलं ‘या’ हिरोईनचं नाव; म्हणाला, “तिला भेटल्यावर…”