-
हिवाळ्यात वातावरण थंड असतं. अशात शरीरात जीवनसत्त्व कमी असल्यामुळे थंडी वाजू शकते. त्यामुळे कोणते जीवनसत्त्व कसे वाढवावे हे जाणून घेऊया. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
हिवाळ्यातील आजार : हिवाळा आला की सोबत सर्दी, खोकला, व्हायरल ताप येतो. याचं कारण बाहेरील वातावरण तर आहेच, पण शरीरातील जीवनसत्त्वाची कमीसुद्धा आहे. कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे सर्दी, ताप होतो ते जाणून घेऊ. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
जीवनसत्त्व ड : जीवनसत्त्व ड कमी झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे विविध जंतूंशी शरीर लढू शकत नाही व व्हायरल आजार होतात. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
काय खावे? जीवनसत्त्व ड साठी सकाळची सूर्यकिरणं महत्त्वाची आहेत. पण अंडी, सॅलमन मासा, दूध, दही यांच्यात ड जीवनसत्त्व मिळतं. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
जीवनसत्त्व क : याच्या कमतरतेमुळेसुद्धा रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच ऊर्जासुद्धा कमी होते. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
काय खावे : संत्र, लिंबू, मोसंबी तसेच हिरव्या पालेभाज्या खाव्यात, यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व क मिळेल. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
जीवनसत्त्व ब २ : याच्या कमतरतेमुळे थकवा येतो, कमजोरी येते. शरीराचे तापमानसुद्धा कमी जास्त होते. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
काय खायला हवं : सोयाबीन व टोफूमध्ये जीवनसत्त्व ब १२ असते. मासे, अंडी, मांस यात मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असतं. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
जीवनसत्त्व ई : यात असे अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात, परिणामी थंडी वाजत नाही. व्हिटॅमिन ई नसेल तर थंडी आपण सहन करू शकत नाही. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
काय खावे : पालक, ब्रोकोली, सूर्यफुलाच्या बिया, ऑलिव्ह ऑईल खाल्ल्याने जीवनसत्त्व ई वाढते. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
-
याचसोबत जेव्हा चरबी कमी असते तेव्हा थंडी जास्त वाजते. तसेच आयरीन कमी झाल्यास थंडी वाजते. (स्रोत: फोटो पेक्सेल्स)
बॉलीवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? अक्षय खन्नाने घेतलं ‘या’ हिरोईनचं नाव; म्हणाला, “तिला भेटल्यावर…”